Congress News : मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

पक्षाच्या संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव गाठीशी आहे. त्याचाच फायदा करून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस हायकमांडकडून होताना दिसत आहे
 Manikrao Thakare
Manikrao Thakare Sarkarmama

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीत गेलेले माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (Manikrao Thakre) यांच्यावर काँग्रेस (congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. अंतर्गत मतभेदाने पोखरलेल्या तेलंगणा काँग्रेसच्या प्रभारीपदी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणा (Telangana) जबाबदारी देऊन खर्गे यांनी ठाकरे यांचे एक प्रकारे राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. (Manikrao Thakare elected as in-charge of Telangana Congress)

काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांच्या आदेशाने सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ठाकरे यांच्या नियुक्तीचे पत्र जाहीर केले आहे. तेलंगणामध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माणिकराव ठाकरे यांच्याकडे काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 Manikrao Thakare
Karnataka : विधानसभेत साडेदहा लाखांची रोकड नेण्याचा प्रयत्न : एकाला अटक

माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ठाकरे यांनी २००८ ते २०१५ या कालावधीत तब्बल सात वर्षे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाच्या संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव गाठीशी आहे. त्याचाच फायदा करून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस हायकमांडकडून होताना दिसत आहे. प्रदेशाध्यक्षपदाशिवाय, ठाकरे यांनी विधान परिषदेचे उपसभापती, गृहराज्यमंत्री, ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

 Manikrao Thakare
Rane-Shivsena Politics : राऊतांना पुन्हा जेलमध्ये टाकणार; नारायण राणेंचा खुला इशारा

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भूषवलेल्या माणिकराव ठाकरे यांना प्रथमच राज्याबाहेर काँग्रेसकडून जबाबदारी देण्यात आलेली आहे. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रेवंथ रेड्डी आणि इतर काँग्रेस नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. रेड्डी यांच्या कलानेच माजी प्रभारी खासदार माणिकम टागोर हे निर्णय घेत असल्याचा आरोप इतर नेत्यांकडून होत होता. त्यामुळ टागोर यांना हटवून त्या ठिकाणी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

एकेकाळी काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यात के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच, भाजपचीही ताकद वाढत आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेदामुळे खिळखिळी झालेल्या काँग्रेसला सावरण्याचे काम ठाकरे यांना करावे लागणार आहे. सर्वांना एकत्रित करत आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान माणिकराव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com