सत्तारांचा राजीनामा मागणाऱ्या अजितदादांनाच मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा : ‘विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही...’

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे गायरान जमिन गैरव्यवहार प्रकारण आणि सिल्लोड कृषी महोत्सवासाठी वसुली सुरू असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
Eknath Shinde : Ajit Pawar
Eknath Shinde : Ajit Pawar Sarkarnama

दिल्ली : विधानसभेत आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (ता. २६ डिसेंबर) कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर दिल्लीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षनेते पवार आणि विरोध पक्षांनाच थेट इशारा दिला. विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही माहिती घेण्यात येईल, अशा शब्दांत पवारांना टार्गेट केले. (Let us know about the cases of opposition leader Ajit Pawar : Eknath Shinde)

वीर बालदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त मत्रुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना सत्तार यांच्या राजीनाम्याबद्दल विचारण्यात आल्यानंतर शिंदे यांनी थेट विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेते यांनाचा इशारा देऊन टाकला. ते म्हणाले की, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपाची माहिती घेण्यात येईल. तसेच, विरोधी पक्षनेत्यांच्या आणि विरोधी पक्षांच्या प्रकरणांचीही माहिती घेतली जाईल. तसेच, सत्ताधारी लोकांच्या प्रकारणांचीही माहिती काढण्यात येईल.

Eknath Shinde : Ajit Pawar
सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित : आरोग्य मंत्री सावंतांची विधान परिषदेत घोषणा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे गायरान जमिन गैरव्यवहार प्रकारण आणि सिल्लोड कृषी महोत्सवासाठी वसुली सुरू असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्या प्रकरणी कृषीमंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पवार यांनी केली. त्यासंदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते पवारांनाच थेट इशारा दिला.

Eknath Shinde : Ajit Pawar
शिवसेनेत नाराजीनाट्य : सभेत बोलू न दिल्याने प्रवक्ते कार्यक्रम सोडून निघून गेले!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुप्रीम कोर्टात हे प्रकारण न्यायप्रविष्ठ आहे. प्रथमच केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. हा विषय गेली ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या या प्रकरणावर कोणताही परिणाम होऊ नये, याची काळजी आम्ही घेत आहोत. ती कर्नाटकनेही घेतली पाहिजे. तसेच विरोधी पक्षाच्या लोकांनीही घेतली पाहिजे.

Eknath Shinde : Ajit Pawar
पवारांच्या फोननंतर अजितदादा आक्रमक : सत्तारांचा राजीनामा मागत फडणवीसांवर केला हल्लाबोल...

आमच्या विरोधात सध्या जे बोलत आहेत. त्यांनी सीमा भागातील योजना बंद केल्या हेात्या. आम्ही त्या योजना पूर्ववत सुरू केल्या आहेत. सीमावादाच्या आंदोलनात जेल भोगलेला हा एकनाथ शिंदे आहे, त्यामुळे सीमावादाच्या प्रश्नावर आम्हाला इतरांनी शिकवण्याची गरज नाही. सीमावासीयांच्या पाठीशी संपूर्णपणे सरकार उभे राहील. कर्नाटकविरोधात उद्या विधीमंडळात ठराव होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com