‘लक्ष्मणभाऊ, प्रकृती महत्वाची; तुम्ही विश्रांती घ्या’ म्हणणाऱ्या फडणवीसांना जगताप म्हणाले ‘मी येणारच’

विधान परिषद निवडणूक : भाजपचे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईला जाणार
‘लक्ष्मणभाऊ, प्रकृती महत्वाची; तुम्ही विश्रांती घ्या’ म्हणणाऱ्या फडणवीसांना जगताप म्हणाले ‘मी येणारच’
Laxman JagtapSarkarnama

पुणे : भारतीय जनता पक्षाचे (BJP) चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) हे तब्बल ५० दिवस दुर्धर आजाराशी लढून नुकतेच घरी परतले. त्यानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत डॉक्टरांनी सूचना करूनही ते पक्षासाठी मतदानाला ॲम्ब्युलन्समधून मुंबईला पोचले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही (Legislative Council Election) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘लक्ष्मणभाऊ, राज्यसभेला तुम्ही फार मोठी कामगिरी बजावलीये. प्रकृती महत्वाची आहे, तुम्ही विश्रांती घ्या,’ असे समजावून सांगितले. मात्र, त्यास नकार देत ‘मी मतदानाला येणारच’ असे आमदार जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले. (Legislative Council Election: BJP's Laxman Jagtap, Mukta Tilak to go to Mumbai for voting)

दरम्यान, सोमवारी (ता. २० जून) सकाळी ७ वाजता आमदार लक्ष्मण जगताप हे त्यांच्या निवासस्थानाहून, तर आमदार मुक्ता टिळक या केसरीवाड्यातून साडेसहा वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे पुणे शहराचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली आहे.

Laxman Jagtap
मोठी बातमी : राष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव पुढे; काँग्रेसश्रेष्ठींच्या निरोपानंतर दिल्लीत दाखल!

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांची प्रकृती सध्या ठीक नाही. ते सध्या दुर्धर आजाराशी लढा देत आहेत, त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या दोघांनाही मतदानासाठी आले नाही तर चालेल. तुमची प्रकृती महत्वाची आहे, त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्यावी, असा सल्ला मुंबईत शनिवारी झालेल्या बैठकीतून कॉन्फरन्स कॉलद्वारे दिला. मात्र, त्यास नकार देत जगताप आणि टिळक यांनी मतदानाला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Laxman Jagtap
राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंची नाराजी कायम; मतदान काही तासांवर तरीही मुंबईत पोचले नाहीत!

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची शनिवारी मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याच बैठकीतून मोबाईलवरून देवेंद्र फडणवीस आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगतपा यांच्याशी संवाद साधला. तेव्हा शंकर जगताप म्हणाले की, ‘साहेब एक मिनिट थांबा, लक्ष्मणभाऊ बोलत आहेत.’ त्यानंतर ‘लक्ष्मणभाऊ तुम्ही राज्यसभा निवडणुकीच्या वेळी फार मोठी कामगिरी बजावली आहे. आता उद्या (ता. २० विधान परिषद निवडणुकीचे मतदान) आला नाहीत तरी चालेल. प्रकृती महत्वाची आहे, तुम्ही विश्रांती घ्या, असे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील भ्रमणध्वनीवरून बोलत होते. तेवढ्यात, लक्ष्मण जगताप मात्र ‘मी येणार आहे उद्या,’ असं सांगत होते, अशी माहिती खर्डेकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in