गांधी, ठाकरे, पवार एकत्र? १९ एकरचे ग्राऊंड, अडीच लाखांची प्रेक्षक क्षमता : काँग्रेसची धडकी भरवणारी तयारी!

Bharat Jodo Yatra News : राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेसाठी मोठी तयारी
Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi
Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia GandhiSarkarnama

Bharat Jodo Yatra News : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये शेगावच्या सभेसाठी काँग्रेसने 'दिवसाची रात्र' करणे सुरू केले आहे. ही सभा सगळ्यात मोठी करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. कारण महाविकास आघाडीसाठी ही सभा राज्याच्या राजकारणात नव संजीवनी देणारी ठरवू शकते.

शेगावच्या सभेमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी यांच्यासह या सभेसाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे तीनही पक्षाचे कार्यकर्ते या सभेला मोठ्या प्रमाणात येवू शकतात. त्यासाठी काँग्रेसच्या वतीने मोठी तयारी करण्यात येत आहे.

Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi
'देवेंद्र फडणवीसांना हे सरकार चालवण्यात रस नाही!'

या सभेसाठी १९ एकरचे मैदान तयार करण्यात येत आहे. तसेच अडीच लाखांवर प्रेक्षक क्षमता, १८ सेक्टर अन् ११ प्रवेशद्वार, अशी जय्यत तयारी सुरू आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशा भारत जोडो पदयात्रेवर निघालेले राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील दुसरी सभा बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे १८ नोव्हेंबरला होणार आहे. ही सभा जंगी व्हावी यासाठी प्रदेश काँग्रेस, राज्यातील प्रमुख नेते ते जिल्हा काँग्रेस सर्वच नियोजन करत आहेत.

ही सभा प्रदेश काँग्रेसच्या प्रतिष्ठेचाच विषय झाला आहे. काँग्रेसने ही सभा गंभीरतेने घेतली आहे. कसेही करून सभा विक्रमी करायची असा चंगच पक्षाने बांधला आहे. नेत्यांनी पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण काही काळासाठी लांब ठेवून शेगावात मुक्काम ठोकला आहे. आनंद सागर जवळील १९ एकर शेतजमिनीवर होणाऱ्या या सभेचे नियोजन अभूतपूर्व आहे. या मैदानाची क्षमता अडीच लाखांवर आहे. तसेच मागील मोकळ्या जागेत उभे राहून का होईना लाखाच्या आसपास प्रेक्षक सभा ऐकू शकतात. या सभेत तीन व्यासपीठ राहणार असून श्रोत्यांसाठी १८ सेक्टर आणि ११ प्रवेशद्वार तयार करण्यात आले येत आहेत.

या सभेला येणारी गर्दी लाखांमध्येच असणार हे गृहीत धरून नियोजन करण्यात येत आहे. विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी यामध्ये ताकद पणाला लावली आहे. या सभेची तयारी मागील दोन महिन्यांपासून करण्यात येत असल्याचे काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी माध्यमांना दिली.

Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi
हर्षवर्धन पाटील-दत्तात्रेय भरणे यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागणार!

काँग्रेससाठी ही सभा महत्त्वाची असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी शेगाव येथे भेटी देऊन नियोजनासंदर्भात बैठका घेतल्या आहेत. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी भक्कम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. आघाडीचे तीनही नेते एकत्र आल्यास राज्यात वेगळा संदेश जाऊन कार्यकर्त्यांना वेगळी उर्जा मिळेल, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in