पंतप्रधान मोदींना पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर

येत्या २४ एप्रिल रोजी उषा मंगेशकर यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
 Lata Mangeshkar-Narendra Modi
Lata Mangeshkar-Narendra Modi Sarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर (Lata Mangeshkar) पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २४ एप्रिल रोजी उषा मंगेशकर यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. (Lata Mangeshkar Award announced to Prime Minister Narendra Modi)

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मुंबईत याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आगामी दोन वर्षांचेही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुढील वर्षी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना, तर त्यापुढील वर्षाचा पुरस्कार भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला देण्यात येणार आहे, असे मंगेशकर यांनी स्पष्ट केले.

 Lata Mangeshkar-Narendra Modi
जयंत पाटलांनी सांगितले ईडी, इन्कम टॅक्सचे छापे पडण्याचे कारण...

हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले की, देशहित, समाजहितासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला दर वर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. पहिलाच पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्हाला या वर्षीचा सगळ्यात मोठा धक्का बसला, तो दीदींच्या जाण्यानी. भारतरत्न लता दीदींच्या नावाने आम्ही हा पुरस्कार देत आहोत. लतादीदीच्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे. ती व्यक्ती एक नंबर असली पाहिजे. मोदी दीदींना बहिण मानायचे आणि ते राजकाकीय क्षेत्रातील नंबर एकवर आहेत.

 Lata Mangeshkar-Narendra Modi
Silver Oak Attack : ॲड. सदावर्तेंचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; १३ तारखेपर्यंत रवानगी

सुमारे १५ वर्षांपूर्वी आम्ही बांधवांनी पुण्यात हॉस्पिटल बांधले, तेव्हा मोदी आले होते. तेव्हा लतादीदी बोलल्या होत्या की, मोदी यांनी पंतप्रधान व्हावं, तेव्हा तिच्यावर सगळ्यांनी टीका केली होती. पण, ती सरस्वतीची अवतार होती, त्यामुळे ती गोष्ट खरी ठरली. गेली ३५ वर्ष आम्ही हा सोहळा करत आहोत. मोठमोठ्या लोकांना हा पुरस्कार देत आहोत आणि यापुढेही देत राहू. विशेष म्हणेज हे वर्षी मास्तर दीदीनाथ मंगेशकर यांची ८० वी पुण्यतिथी आहे आणि लता दीदींच्या संगीत प्रवासालाही या संगीतसृष्टीत ८० वर्षे झाली आहेत, अशी माहितीही हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली.

 Lata Mangeshkar-Narendra Modi
सुरू झाले घोषित व अघोषित लोडशेडींग अन् लोकांना झाली बावनकुळेंची आठवण…

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २४ एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत. उषा मंगेशकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार वितरणानंतर रूपकुमार राठोड, हरिहरन, प्रियांका बर्वे आणि आर्या आंबेकर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

 Lata Mangeshkar-Narendra Modi
'पन्नास लाखांच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले'

आकाशवाणीतील नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर दावे प्रतिदावे करण्यात आले होते. त्या वादावर त्यांनी भाष्य केले. त्या गोष्टींना काही महत्त्व नाही. मी ज्यावेळी आकाशवाणीवर होतो. तेव्हाचे लोक आता नाहीत. पण त्यावर मी आता काही बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com