शिवसेनेतून हकालपट्टीनंतर क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘त्यात गैर काय...?’

जयदत्त क्षीरसागर हे बाहेरगावी आहेत. ते परत आल्यानंतर या हकालपट्टीच्या निर्णयावर परिवारातील ज्येष्ठ आणि आमच्याबरोबर काम करणारे सहकारी यांच्या चर्चा करून काय करायचे? याबाबतची पुढची दिशा ठरवू.
Jaydatta Kshirsagar
Jaydatta KshirsagarSarkarnama

बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांची शिवसेनेतून (shivsena) हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शनिवारी (ता. २२ ऑक्टोबर) करण्यात आली. त्यावर क्षीरसागर यांच्याकडून पहिलीच प्रतिक्रिया येत आहे. ‘बीडच्या (Beed) विकासकामांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणे हे गैर नाही,’ असे जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे. (Kshirsagar's first reaction after expulsion from Shiv Sena; Said 'What's wrong with that...?')

बीडमधील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निमंत्रित केले होते. वास्तविक पाहता क्षीरसागर हे सध्या शिवसेनेत आहेत. असे असूनही त्यांनी बीडमधील कार्यक्रमास शिंदे-फडणवीस यांना बोलावले होते. त्या कार्यक्रमानंतर दोन दिवसांत क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Jaydatta Kshirsagar
पहिला आसूड उद्धव ठाकरेंवरच चालवला पाहिजे : रावसाहेब दानवेंचे उत्तर

हकालपट्टीच्या घोषणेवर क्षीरसागर कुटुंबीयांकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे पुणते योगेश क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीचे समर्थन केले आहे.

Jaydatta Kshirsagar
धनंजय मुंडेंनी बांधावरूनच लावला सचिवांना फोन अन्‌ म्हणाले...

योगेश क्षीरसागर म्हणाले की, जयदत्त क्षीरसागर हे बाहेरगावी आहेत. ते परत आल्यानंतर या हकालपट्टीच्या निर्णयावर परिवारातील ज्येष्ठ आणि आमच्याबरोबर काम करणारे सहकारी यांच्या चर्चा करून काय करायचे? याबाबतची पुढची दिशा ठरवू. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर काही आरोप करून कारवाईचे सांगितले. मात्र, आमच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. विकासाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बीडकरांच्या हिताच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही गेलो. आम्ही काही स्वतःचे प्रश्न घेऊन गेलो नाही तर जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो. विकासकामांसाठी पक्षीय बाधा कुठे नसावी, असे राजकारण आमचा परिवार करत आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com