जिकडे विनय कोरे तिकडे अध्यक्षपदाचा गुलाल!

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख दावेदार
vinay kore
vinay koresarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (kdcc bank) प्रक्रिया संस्था व पतसंस्था गटातील सत्तारूढ गटाच्या उमेदवारांच्या पराभवामुळे नाराज झालेले आमदार डॉ. विनय कोरे (vinay kore) हे कोणाला साथ देणार, त्यावर जिल्हा बँकेचा अध्यक्ष ठरणार आहे. सद्यस्थितीत कोरे हे सत्तारूढ गटासोबत असल्याने विद्यमान अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushirf) हेच अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचा समझोता झाल्यास अडीच वर्षांनंतर काँग्रेसलाही अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा अध्यक्ष कोण होणार आणि कोरे कोणासोबत राहणार, यावर हे गणित अवलंबून आहे. (Kolhapur District Bank Chairman Vinay Kore will decide)

नव्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे म्हणून मुश्रीफ यांच्यासह आठ संचालक आहेत. शिवसेनेचे असूनही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने हे दोघे सत्तारूढ गटातून विजयी झाले आहेत. या दोघांचा पाठिंबा राष्ट्रवादीला राहिल्यास संख्याबळ १० वर पोचते. बँकेच्या राजकारणात मंत्री यड्रावकर व माने मुश्रीफ यांच्यासोबतच राहतील, अशी शक्यता आहे. मात्र, शिवसेनेकडून दबाव आल्यास या दोघांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मुश्रीफ यांना अध्यक्ष व्हायचे झाल्यास त्यांना कोरे यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

vinay kore
दोनच वर्षात यड्रावकर विरोधकांना पुरुन उरले; आमदार, मंत्री अन् जिल्हा बँकेवरही गेले

मुश्रीफ-कोरे मैत्रीचा सिलसिला कायम राहणार?

दुसरीकडे काँग्रेसचे पाच, अमल महाडिक यांच्यासह कोरे यांचे तीन, विरोधी पॅनेलमधून शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. कोरे विरोधात गेल्यास ही संख्याही ११ वर जाते. पण, कोरे हे सद्यस्थितीत कोणासोबत जातील, हे निश्‍चित नाही. सत्तारूढ गटाचे पॅनेल ठरवताना कोरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या आग्रहाखातर प्रक्रिया गटातून प्रदीप पाटील-भुयेकर व पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. पण, या दोघांचाही पराभव झाला. सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी विश्‍वासघात करून सुरूंग लावल्याचा आरोप या दोघांच्या पराभावानंतर व्यक्त करून कोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची ही नाराजी कायम राहणार की मुश्रीफ-कोरे यांच्यातील मैत्रीचा सिलसिला जिंकणार यावरही अध्यक्ष पदाचे गणित अवलंबून आहे.

vinay kore
सोळा वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या पराभवाचे सुधीर देसाईंनी काढले उट्टे!

काँग्रेसला संधी की पुन्हा पदरी निराशाच?

राज्यात दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आहे. हीच महाविकास आघाडी कायम राहिल्यास काँग्रेसची राष्ट्रवादीला साथ मिळेल. राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे पाच मिळून संचालकांची संख्या १३ वर जाते. यात अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद वाटून घेतल्यास यावर तोडगा शक्य आहे. गेल्या निवडणुकीनंतरही अध्यक्षपदाचा असाच फार्म्युला ठरला होता. त्यावेळी पहिली अडीच वर्षे मुश्रीफ तर नंतर पी. एन. यांना अध्यक्ष करण्याचे ठरले होते. पण, तसे झाले नाही. आता हाच फॉर्म्युलाचा दबाव टाकून काँग्रेस पहिल्यांदाच अध्यक्ष पदावर दावा करू शकते. तसे झाल्यास पी. एन. पाटील यांनाही अध्यक्षपदाची संधी आहे.

vinay kore
मंडलिकांचा तो दावा फेटाळत रणवीरसिंह गायकवाड म्हणाले, ‘मी तर राष्ट्रवादीचाच’

सतेज पाटलांना कोरेंचा विरोधा न परवडणारा

वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीतही पी. एन. यांनी अध्यक्षपद मिळाले तर आनंदच होईल, असे सूतोवाच केले होते. कोरे यांची नाराजी, त्यातून विरोधकांची मोर्चेबांधणी यावर तोडगा म्हणून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. पण, त्याचवेळी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यात कोरे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. त्यातून कोरे हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर दबाव आणू शकतात. आगामी ‘राजाराम’ कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता पालकमंत्री पाटील यांनाही कोरे यांचा विरोध परवडणारा नसेल. त्यामुळे कोरे यांची अध्यक्ष निवडीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर या घडामोडींना वेग येणार आहे.

vinay kore
सत्तारुढ नेत्यांनी विश्वासघात केला; योग्यवेळी किंमत मोजावी लागेल : विनय कोरेंचा हल्लाबोल

उपाध्यक्षपदावर तोडगा निघण्याची शक्यता

प्रक्रिया गटातील निकालावर नाराज असलेल्या कोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी ते म्हणतील त्यांना उपाध्यक्ष पद देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. काँग्रेसने राष्ट्रवादीला म्हणजे मुश्रीफ यांना साथ दिली तर कोरे यांनाही त्यांच्यासोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ म्हणत कोरे हेही आपण म्हणेल तो उपाध्यक्ष ठरवू शकतात, अशीही चर्चा कोल्हापुरात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com