किरण माने, सतीश राजवाडे जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला; बैठकीसाठी अमोल कोल्हेंचा पुढाकार!

एक चांगली मालिका बंद होऊ नये, एवढीच आमची इच्छा आहे. एकदा भूमिका घेतली की त्यातून मी मागे हटत नाही.
Kiran Mane-Satish Rajwade-Jitendra Awhad
Kiran Mane-Satish Rajwade-Jitendra Awhadsarkarnama

मुंबई : स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिकेतून काढून टाकण्यात आलेले किरण माने (kiran mane) यांनी आज (ता. २० जानेवारी) राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची भेट घेतली. या वेळी स्टार प्रवाह वाहिनीचे सतीश राजवाडे हेही सोबत होते. या भेटीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटी वेळी खासदार अमोल कोल्हे, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. (Kiran Mane, Satish Rajwade of Star Pravah meet Jitendra Awhad)

दरम्यान, या भेटीबाबत मंत्री आव्हाड म्हणाले की, किरण माने प्रकरणात स्टार प्रवाह वाहिनीचे सतीश राजवाडे यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही त्यांना विचारले की, मालिकेतून काढण्यापूर्वी किरण माने यांना याआधी नोटीस दिली होती का? एखाद्या कलाकाराला बाहेर काढणे, हे माणुसकीच्या विरोधातली गोष्ट आहे. सर्व महिला कलाकारांनी माने यांची बाजू घेतली आहे. एका महिलेने त्याच्यावर आरोप केला. पण, बाकीच्या महिला कलाकारांनी त्यांची बाजू घेतली आहे. याबाबत प्रोडक्शन हाऊसने त्यांना कधी सांगितले होते का? अशी विचारणा आम्ही राजवाडे यांना केली आहे.

Kiran Mane-Satish Rajwade-Jitendra Awhad
दोन वर्षांपासून मागणी करणाऱ्या IPS अधिकाऱ्याची अखेर बदली!

एक चांगली मालिका बंद होऊ नये, एवढीच आमची इच्छा आहे. एकदा भूमिका घेतली की त्यातून मी मागे हटत नाही. हा वैचारिक लढा नाही. हा राजकीय अभिनिवेश नाही. किरण माने हे प्रकरण घेऊन माझ्यापर्यत आले होते; म्हणून मी त्यांची बाजू घेतली, असे सांगून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या संदर्भात स्टार प्रवाह वाहिनीचे प्रोडक्शन हाऊसचे लोक येऊन भेटणार आहेत.

Kiran Mane-Satish Rajwade-Jitendra Awhad
नीलेश लंकेंनी 24 तासांच्या आतच अपक्षाला गळाला लावले

दरम्यान, सोशल मीडियावर आपण केलेल्या पोस्टमुळे मला मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे, असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर राज्यात मोठे वादंग उठले होते. माने यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटून याबाबत चर्चा केली होती. त्यातच माने यांच्या आरोपाचा रोख भाजपकडे जात होता, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

Kiran Mane-Satish Rajwade-Jitendra Awhad
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर राजूबाबा आवळे उपाध्यक्ष

त्यावेळी माने यांच्या बाजूने फेसबुक पोस्ट लिहित जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच, भाजपकडून माने यांच्यावर टीकाही झाली होती. दरम्यान, खासदार कोल्हे यांनी पुढाकार घेत ही बैठक आयोजित केल्याने याप्रकरणी काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com