किंगमेकर सुरेश हसापुरे भविष्यात आमदार बनतील : माजी मंत्री म्हेत्रेंची भविष्यवाणी

काही लोकांना हसापुरे जड होतील, अशी भीती वाटते, म्हणूनच त्यांना ते जिल्ह्यातच ठेवू पहात आहेत.
Suresh Hasapure
Suresh HasapureSarkarnama

सोलापूर : सर्व पक्षातील नेत्यांसोबत असलेले चांगले संबंध, कुशाग्र बुद्धीमतेच्या जोरावर सुरेश हसापुरे यांनी सोलापूर (solapur) जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळख निर्माण केली आहे. हसापुरे यांना एखादी गोष्ट सांगितली, तर ती होणारच, असा विश्वास सर्वांना वाटतो, त्यामुळेच त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते. मात्र, काही लोकांना ते जड होतील, अशी भीती वाटते, म्हणूनच त्यांना ते जिल्ह्यातच ठेवू पहात आहेत. हसापुरे एक बहुआयामी नेतृत्व आहे. त्यांच्या विकासकामालाही तोड नाही. सध्या तरी त्यांनी झेडपी आणि डीसीसीमध्ये किंगमेकर म्हणून राहावे. संधी प्रत्येकाला मिळते, हसापुरे यांनाही संधी मिळेल आणि ते आमदारही होतील, असा विश्‍वास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी व्यक्त केला. दरम्यान, म्हेत्रे यांच्या या विधानामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला असेल. (Kingmaker Suresh Hasapure to become MLA in future : Siddharam Mhetre)

Suresh Hasapure
पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण

जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचा वाढदिवसानिमित्त टाकळीकर मंगल कार्यालयात आज झालेल्या नागरी सत्कार प्रसंगी म्हेत्रे बोलत होते. या वेळी आमदार संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरीश पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी जुबेर प्रजापती यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार संजय शिंदे म्हणाले, डीसीसीच्या माध्यमातून हसापुरेंना ज्येष्ठांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी चांगले काम केल्यानेच त्यांना डीसीसीत तीन वेळा संधी मिळाली. सध्याच्या जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीत नेत्यांना जोडणारा दुवा म्हणून हसापुरे चांगले काम करत आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीत आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू.

Suresh Hasapure
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद मिळूनही सोलापूरची पाण्याची काय अवस्था? : अजितदादांचा शिंदे-मोहितेंना टोला

माजी सभापती डोंगरे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हसापुरे राजकारणात आले आणि आज ते किंगमेकर म्हणून ओळखले जातात. देशाचे नेते शरद पवार यांच्या डोक्यात काय चालले आहे? हे जसे कळत नाही, तसे सोलापूर जिल्ह्यात हसापुरे यांच्या डोक्यात काय चालले आहे? तेच समजत नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीत जनतेने कायम त्यांच्या पाठीशी उभे राहावे.

Suresh Hasapure
चुकीची गोष्ट घडू नये; म्हणून मद्यप्राशन करून आलेल्या त्या कामगाराला मारले : राजेंद्र राऊत

या वेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील साठ सोसायट्यांमधील नूतन संचालकांचा आणि ज्येष्ठ तेरा नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सुभाष पाटोळे, मोतीलाल राठोड, सोमशंकर करजोळे, संतोष पवार, पद्मसिंह शिवशेट्टी-पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Suresh Hasapure
काटेवाडीला‌ पाणी नेण्याचा अजित पवारांचा डाव : राष्ट्रवादीच्या संजय पाटलांचा आरोप

दक्षिण सोलापूरच्या जनतेने मला मोठे केले, त्यांच्यासाठी २४ तास उपलब्ध असेन

वाढदिवस साजरा करावा, अशी माझी इच्छा नव्हती. मित्र परिवार व मार्गदर्शकांनी आग्रह धरल्याने वाढदिवस साजरा केला. ज्यांनी मला तीन वेळा डीसीसीचे संचालक केले, त्यांचा सत्कार करावा, अशी संकल्पना होती. ती संकल्पना सत्यात उतरली, याचा आनंद आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेने मला मोठे केले आहे. या जनतेच्या सेवेसाठी मी २४ तास कटिबद्ध राहीन, असा शब्द हसापुरे यांनी सत्काराला उत्तर देताना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com