कात्रज डेअरी : ऐनवेळी मतदारसंघ बदलूनही केशरताई पवारांची विक्रमी मतांनी बाजी!

कात्रज डेअरी निवडणूक : केशरताई पवार यांचा विक्रमी मतांनी चौथ्यांदा विजय
कात्रज डेअरी : ऐनवेळी मतदारसंघ बदलूनही केशरताई पवारांची विक्रमी मतांनी बाजी!
Keshartai PawarSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) निवडणुकीत २००० पासून महिला संचालकपदावर हॅट्‌ट्रीक केलेल्या माजी उपाध्यक्षा केशरताई पवार यांनी चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. महिला मतदारसंघात विक्रमी ७८‍ टक्के मतदारांच्या पाठिंब्यानिशी सर्वाधिक ५४८ मते मिळवत त्यांनी पुन्हा एकदा कात्रज डेअरीत प्रवेश मिळविला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी सुरुवातीला त्यांना अ मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्या प्रचारालाही लागल्या होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांना पुन्हा महिला मतदार संघातून लढण्याचा आदेश पक्षाने दिला. त्यानंतरही विक्रमी मते घेत पवार यांनी मारलेली बाजी लक्षवेधी ठरली. (Katraj Dairy Election: Keshartai Pawar wins for the fourth time with record votes)

दरम्यान, केशरताई पवार यांच्या खालोखाल लता गोपाळे (खेड) या विजयी झाल्या असून त्यांना ४३७ मते मिळाली आहेत. पुणे जिल्हा दुध संघात २००० मध्ये केशरताई पवार यांनी महिला संचालिका म्हणून प्रवेश केला. त्यानंतर २००५ चीही निवडणूक त्या जिंकल्या. कौटुंबीक कारणामुळे त्यांनी २०११ ची निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा दूध संघाच्या रिंगणात उतरल्या. यंदाच्या निवडणुकीत स्वत:ला सिद्ध करीत दूध संघात सलग चार पंचवार्षिक महिला संचालिक म्हणून राहण्याचा त्यांनी विक्रमही केला आहे.

Keshartai Pawar
भाच्याकडून मामाची ४२ वर्षांची सत्ता खालसा : राष्ट्रवादीने मुळशीला दिले दोन संचालक!

महिला मतदार संघातून तीन पंचवार्षिक निवडणूक लढल्याने त्यांनी या वेळी अ (तालुका) मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीकडे केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, तसेच गृहमंत्री वळसे पाटील यांच्या दोघांच्या विचाराने त्यांना पुन्हा महिला मतदार संघात, तर त्यांच्या जागी स्वप्निल ढमढेरे यांना संधी देत शिरूरसाठी तीन संचालक मिळविले. कात्रज डेअरीच्या महिलांच्या दोन जागांपैकी दुसऱ्या जागेवर लता गोपाळे यांना संधी देण्यात आली होती. त्याही विजयी झाल्या आहेत. महिला मतदारसंघातील विजयी आणि पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे ः केशरबाई पवार (शिरूर, ५४८ मते, विजयी), लता गोपाळे (खेड, मते ४३७, विजयी). पराभूत उमेदवार : रोहिणी थोरात (दौंड, मते ८५), संध्या फापाळे (जुन्नर, मते २०४).

Keshartai Pawar
हर्षवर्धन पाटलांना बालेकिल्ल्यातच धक्का : कट्टर समर्थक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पती आणि दिराची ताकद पाठीशी

आमदार अशोक पवार यांच्या यशाचे गमक म्हणजे त्यांच्या पत्नी सुजाता पवार. पवारांच्या सर्व निवडणूका सुजाताभाभी एकहाती स्वत: हाताळतात. त्याचपद्धतीने केशरताई यांचे दीर प्रकाश पवार हे तालुक्यातील पहिल्या फळीतील नेते आहेत. तसेच, केशरताईंचे पती बांधकाम उद्योजक असून पुणे जिल्हा विकास मंचचे संस्थापक, पुणे-नगर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे केशरताईंच्या पाठिशी पती आणि दिराची मोठी शक्ती असते, हे मतदार संघ बदलूनही केवळ आठच दिवसांतील त्यांच्या विक्रमी मतांनी दाखवून दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in