Basavaraj Bommai News : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना; आम्ही त्यांचा बंदोबस्त करू’

समिती पुन्हा एकदा वरचढ ठरू लागल्याने बोम्मई यांनी हुबळी येथे महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात आगपाखड केली.
Basavaraj Bommai
Basavaraj Bommai Sarkarnama

हुबळी : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा वाद्‌ग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना आहे. त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, असे विधान मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले आहे. त्याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्रात उमटणार आहेत. (Karnataka CM Basavaraj Bommai criticizes Maharashtra Ekikaran Samiti)

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे हुबळी येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी दर्पोक्ती केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) माध्यमातून सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येत एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळे समितीकडून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे राहिले आहेत. त्याबाबत बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत त्यांची जीभ घसरली. समितीला त्यांनी थेट उचापती संघटना म्हटले आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही तर बेळगावातील जनताच समितीला पाच वर्षे घरी बसवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Basavaraj Bommai
Dudhani Bazar Samiti Vishleshan : भल्या भल्यांना जमलं नाही; ते भाजपच्या सचिन कल्याणशेट्टींनी करून दाखवलं!

महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीत जनतेची माथी बिघडविण्याचे काम करत आहे. बेळगावच्या जनतेला हे सर्व ठाऊक आहे. त्यामुळे बेळगावची जनता त्यांना चोख उत्तर देईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यावर देखील टीका केली. पंतप्रधान खेडेगावापर्यंत पोहोचू नये, त्यांनी दिल्लीतच राहावे, अशी सिद्धरामय्या यांची भावना आहे.

काँग्रेसला बदल आवडत नाही. राज्यातील जनता संकटात सापडलेली असताना पंतप्रधान मोदी यांनीच राज्याला मोठी आर्थिक मदत देऊ केली आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असतानाच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे राज्यात आले होते का, असा सवालही बसवराज बोम्मई यांनी उपस्थित केला.

Basavaraj Bommai
Khed Bazar Samiti : खेड बाजार समिती निवडणुकीत ५० कोटींच्या उलाढाली चर्चा; खुद्द आमदार मोहितेंना बसला पाकिट संस्कृतीचा फटका

राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बोलावले जात आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने समितीच्या विरोधात प्रचारासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रीय पक्षांची देखील प्रचारासाठी कोंडी झाली आहे. समिती पुन्हा एकदा वरचढ ठरू लागल्याने बोम्मई यांना देखील त्याची दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्यांनी हुबळी येथे महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात आगपाखड केली.

Basavaraj Bommai
Mangalveda Politic's : माढ्याच्या सावंतांची मंगळवेढ्यात एन्ट्री : भालके गटाच्या झेडपी मतदारसंघात राजकीय पेरणी

बी. एल. संतोष यांच्या लिंगायत मताबाबत केलेल्या विधानाबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत आता काहीच बोलणार नाही, म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com