Rahul Gandhi, Sharad Pawar, Nitish Kumar News
Rahul Gandhi, Sharad Pawar, Nitish Kumar NewsSarkarnama

Rahul Gandhi News : सिद्धरामय्यांच्या शपथ विधी सोहळ्याला दिग्गजांची हजेरी; राहुल गांधींचा 'बंगळुरू पॅर्टन' यशस्वी होणार?

Karnataka Cm Siddaramaiah Oath Ceremony : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा शपथविधी आज (ता.२०) झाला.

Karnataka CM oath Ceremony News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा शपथविधी आज (ता.२०) झाला. या शपथ विधी सोहळ्यात विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बंगळुरुमध्ये हजेरी लावली. आता विरोधकांची ही एकी लोकसभा निवडणुकीत टिकणार का? हा खरा प्रश्न आहे.

आजच्या या शपथविधीला काँग्रेसने नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. तर विरोधी पक्षांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav), तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्ट्रलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल काँन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचूरी, भाकपचे डी. राजा, मेहबुबा मुफ्ती, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, कमल हसन यांच्यासह २० पक्षांचे नेते उपस्थित होते.

Rahul Gandhi, Sharad Pawar, Nitish Kumar News
Dk Shivkumar News : सिद्धरामय्या विधानसभेत निघून गेले; डी. के. शिवकुमारांच्या कृतीने वेधले सगळ्यांचे लक्ष

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी मात्र, बंगळुरूला जाण्याचे टाळले. काँग्रेस (Congress) पक्षाने आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समिती व बहुजन समाज पक्षाला शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले नव्हते.

मात्र, या वेळी उपस्थित असलेल्या नेत्यांना राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वता: भेटले. त्यांची त्यांचे स्वागत केले तसेच प्रत्येकांचा हात हातात घेत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल गांधी यांचे फोट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर राहुल गाधींचा हा बंगळुरु प्रयोग यशस्वी होईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

Rahul Gandhi, Sharad Pawar, Nitish Kumar News
Karnataka CM oath Ceremony : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, डीके शिवकुमार यांच्यासह 'या' आठ आमदारांनी घेतली शपथ

बंगळुरूमधील शपथविधीला उपस्थित राहिलेल्या पक्षांमध्ये एकी झाली तरी त्याचा देशभरात वेगळा संदेश जाऊ शकतो. कर्नाटच्या विजायनंतर विरोधकांना बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजपसोर (BJP) एक मजबूत आघाडी निर्माण करण्याचा काँग्रेसह इतर पक्षांचाही प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी घेतलेला पुढाकार पुढील काळात यशस्वी होता का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com