जामीन मिळताच आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया : ‘चाणक्य’ची नीती फसली...

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बारा कार्यकर्त्यांना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली होती.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

ठाणे : हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणे आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना शनिवारी (ता. १२) दुपारी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत ‘चाणक्यची नीती फसली’, असे ट्विट केले आहे. (Jitendra Awhad's first reaction after getting bail)

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत जामीन मिळाल्याची माहिती स्वतःच दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल, तर जामिनाची पर्वा करायची नसते. ‘चाणक्य’ची नीती फसली. जामीन आणि जेवण दोन्ही मिळाले.

Jitendra Awhad
अमोल किर्तीकरांनी थोपटले वडिलांविरोधात दंड; शिवसेनेच्या बैठकीला हजेरी लावत केला 'हा' निर्धार!

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केल्याचे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यावेळी काही प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला हेाता. त्याच आरोपाखाली जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बारा कार्यकर्त्यांना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली होती.

अटकेनंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात राहता आले नव्हते. त्यामुळे आज आव्हाड यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच, इतर १२ कार्यकर्त्यांनाही जामीन देण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com