फसवाफसवी आपल्याला जमत नाही; आम्ही जे बोलतो ते करतोच : जयंतरावांनी सुनावले

भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर जयंत पाटील यांची टीका
Vilasrao Jagtap-Jayant patil
Vilasrao Jagtap-Jayant patilSarkarnama

जत (जि. सांगली) : काही लोक फसवणूक केल्याचा आरोप आमच्यावर करत आहेत. फसवाफसवीची कामं आपल्याला जमत नाहीत. आम्ही जे बोलतो ते करतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांना नाव न घेता लगावला. (Jayant Patil criticizes former BJP MLA Vilasrao Jagtap)

Vilasrao Jagtap-Jayant patil
आर. आर. आबांचे स्वप्न आपल्याला २०२४ मध्ये पूर्ण करायचं आहे

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्या बैठकीत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राबरोबरच जत तालुक्यातही राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या भागात राष्ट्रवादीचा विस्तार होण्यास मोठी मदत होईल. तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न सांगू शकता. मी मंत्री नंतर आणि अगोदर पक्षाचा कार्यकर्ता आहे.

Vilasrao Jagtap-Jayant patil
मंडलिक, कुपेकरांना उतारवयात कुणी त्रास दिला? समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर निशाणा

जत तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे. तालुक्यातील ६५ गावांसाठीच्या पाणी योजनेच्या कामाला गती देण्यात येईल, त्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल. आगामी काळात मी पुन्हा जत तालुक्यात येईन, तेव्हा आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ. विविध प्रश्नांचा ऊहापोह करण्याचे काम केले जाईल व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी पुन्हा आश्वासित केले.

Vilasrao Jagtap-Jayant patil
आमदार अरुण लाड यांच्या कामामुळे विरोधकही घायाळ : जयंत पाटलांकडून भरसभेत कौतुक

दरम्यान, पाणीप्रश्नावरून भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. ‘जयंतरावांनी जतला सहा टीएमसी पाणी मंजूर केले आहे. शिवाय, विस्तारीत म्हैसाळ योजनाही लवकरच पूर्ण करू,’ असे आश्वासन दिले होते. त्याबाबत पुढील सर्व मंजूरी घेऊन राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूदही केलेली नाही. गेल्या सहा महिन्यांत योजनेच्या सर्व्हे व्यतिरिक्त आश्वासनाच्या केवळ भूलथापाच मिळाल्या आहेत, असा आरोप जगताप यांनी जयंतराव पाटील यांच्यावर केला हेाता.

Vilasrao Jagtap-Jayant patil
मोठी बातमी : ओबीसी महामंडळाच्या कर्ज वसुलीस स्थगिती : मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

मी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. पण, मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. इथेच मी समाधानी आहे, अशी भूमिका माजी आमदार विलासराव जगताप यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com