Lok Sabha Election : भाजपला २०२४ मध्ये बहुमत मिळणे अवघड; प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावणार : नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांचे निरीक्षण

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याकडे पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे. पण...
Mamata Banerjee-Amartya Sen
Mamata Banerjee-Amartya SenSarkarnama

नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावतील. तसेच, भारतीय जनता पक्ष (BJP) आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी (बहुमत मिळविणे अवघड) जिंकेल, असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल, असा महत्वपूर्ण विधान नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन (Amartya Sen) यांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे पंतप्रधान (Prime Minister) बनण्याची क्षमता आहे, असेही सेन यांनी म्हटले आहे. (It will be difficult for BJP to get a majority in upcoming Lok Sabha elections : Amartya Sen)

Mamata Banerjee-Amartya Sen
मोठी बातमी : राष्ट्रवादीला मोठा धक्का; लोकसभेतून खासदार बडतर्फ, संख्याबळ घटले

दरम्यान, काँग्रेस पक्ष खूपच कमकुवत झाला आहे. पण, त्या पक्षाची ताकद ही त्यांचा देशव्यापी दृष्टिकोन आहे, जो इतर कोणत्याही पक्षाकडे नाही. ‘पीटीआय’शी बोलताना अर्थतज्ज्ञ सेन म्हणाले की, लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत काही प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील. यामध्ये द्रमुक, टीएमसी यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. समाजवादी पक्षही तत्कालीन राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल, असे म्हटलं होतं. ते म्हणाले की, भाजपने हिंदुत्वाकडे झुकणारा पक्ष म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे, त्यामुळे कोणताही पक्ष भाजपची जागा घेऊ शकत नाही.

Mamata Banerjee-Amartya Sen
Shetti-Patil News : भालकेंच्या ‘त्या’ विधानानंतर राजू शेट्टी-अभिजित पाटलांची बंद खोलीत तासभर चर्चा

सेन यांनी भाजप सरकारवर यापूर्वीही अनेकदा टीका केली आहे. त्याच प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. सेन म्हणाले की, भाजपने भारताच्या व्हिजनला कमी केले आहे. भारताची समज कमी करून भाजपने फक्त हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत म्हणून पाहिले आहे. भाजपशिवाय पर्याय नाही, हे पाहणे आज खूप दुखदायक आहे. अमर्त्य सेन म्हणाले की, भाजप आज सर्वाधिक शक्तीशाली वाटत असेल तर त्यांचा काही कमकुवतपणाही आहे. मला वाटते की विरोधी पक्षांनी प्रयत्न केल्यास ते भाजपला टक्कर देऊ शकतात.

Mamata Banerjee-Amartya Sen
Congress Leader Join BJP : पुण्यात काँग्रेसला हादरा : किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपत प्रवेश

ममता बॅनर्जी पंतप्रधान होऊ शकतात का, असा प्रश्न अमर्त्य सेन यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, बॅनर्जी यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. पण, ममता बॅनर्जी भाजपच्या विरोधात जनतेचा रोष एकत्र करू शकतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काँग्रेसबाबत बोलताना सेन म्हणाले की, काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे. काँग्रेसमध्ये गटबाजीही मोठी समस्या आहे. मात्र, काँग्रेस हा एकमेव पक्ष देशव्यापी दृष्टी देऊ शकतो, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com