एकनाथ शिंदेचे बंड, हे तर ठाकरेंनी ठरवून केलेले नाटक? त्यावर संजय राऊत म्हणतात...

सोशल मिडियात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाविषयी विविध थिअरीजची चर्चा
Eknath Shinde Latest news, Sanjay Raut News in Marathi
Eknath Shinde Latest news, Sanjay Raut News in MarathiSarkarnama

मुंबई : ठाणे शहराव्यतिरिक्त फारसा प्रभाव नसलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मायबाप मानलेल्या ठाकरेंच्या विरोधात बंड करतात आणि त्यात कॅबिनेट मंत्र्यांसह सेनेचे 40 आमदार सहभागी होतात, यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. एकामागोमाग एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडास पाठिंबा देतात. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) रात्री भेटतात आणि लगेच सकाळी ते बंडखोर ठेवलेल्या गुवाहटीचा रस्ता पकडतात, यावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. हे आमदार जातात की त्यांना पाठविले जात आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते. (Eknath Shinde Latest news)

Eknath Shinde Latest news, Sanjay Raut News in Marathi
Eknath Shinde : ठरलं! समर्थकांसोबत चर्चा करून एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार

एकनाथ शिंदे यांचे बंड हे एक उद्धव ठाकरे दिग्दर्शिक नाट्य असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या समर्थनार्थ पुढील मुद्दे मांडले जातात.(Sanjay Raut News in Marathi )

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे मुख्यमंत्रीपद देण्याचे टाळण्यासाठी ठाकरे यांनी ही खेळी केली आहे. शिवसेनेला केवळ अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हवे होते. ते आता ठाकरे यांनी भूषविले आहे. आता पुढील काळात पुन्हा भाजप-शिवसेना युती व्हावी, असेच ठाकरे यांना वाटत आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले, असा विचार यामागे असल्याचे बोलले जाते. भाजपसोबत गेल्यास उपमुख्यमंत्रीपद, वाढीव मंत्रीपदे, केंद्रातही मंत्रीपद आणि याशिवाय सीबीआय, ईडी यांच्या सुरू असलेल्या चौकशा थांबणे, असा फायदा असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय शिवसेना-भाजप युती झाली तर मुंबई महापालिका पुन्हा सेनेच्या ताब्यात राहण्याचा मार्ग खुला होणार आहे, असे सारे गणित या मागे आहे. महाविकास आघाडी तोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरला जात असल्याचे तर्कशास्त्र यात मांडण्यात येत आहे.

Eknath Shinde Latest news, Sanjay Raut News in Marathi
Eknath Shinde News : शिवसेनेच्या 'या' चार मंत्र्यांसह वीसहून अधिक आमदार नॉट रिचेबल

या साऱ्या चर्चेविषयी पत्रकारांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांनाच प्रश्न विचारला. हे सारे कथित बंड शिवसेनेनेच तर घडवून आणले नाही ना, या सवालावर राऊत यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. पाठीमागून वार करण्याचा ठाकरे यांचा स्वभाव नाही, समोरासमोर ते लढत असतात. त्यामुळे अशा चर्चांत कसलाही अर्थ नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com