श्रीलंकेत महागाईचा भडका; मिर्ची 700 तर बटाट्याचे भाव 200 रुपये किलो

श्रीलंका (Shri Lanka) आर्थिक संकटात सापडल्याने येथे आर्थिक आणीबाणी (Financial emergency) जाहीर करण्यात आली आहे.
श्रीलंकेत महागाईचा भडका; मिर्ची 700 तर बटाट्याचे भाव 200 रुपये किलो
Vegetable prices rise in Sri LankaSarkarnama

पुणे : कोरोना (Covid-19) महामारीमुळे भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेमध्ये (Shrilanka) महागाईचा भडका उडाल्याने (Vegetable prices rise in Sri Lanka) येथील नागरिकांना दोन वेळचे जेवण करणे अवघड झाले आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था मु्ख्यत्वे पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र, कोरोनामुळे या व्यवसायाचे कंबरडे मोडल्याने येथील भाजीपाला आणि खाद्यपदार्थ कमालीचे महागाले आहे. एक किलो मिर्चीची किंमत सुमारे 710 रुपये तर बटाट्याचा भाव किलोला 200 रुपये इतका वाढला आहे. यामुळे श्रीलंकेत मोठे आर्थिक संकट ओढावले असून येथे आर्थिक आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे.

Vegetable prices rise in Sri Lanka
अयोध्येतील राम मंदिरसाठी अनोखी भेट;पाहा व्हिडिओ

Advocata Institute Bath Curry Indicator (BCI) या संस्थेकडून देशातील भाव जाहीर केले जातात. या संस्थेच्या म्हणण्यानूसार श्रीलंकेत गेल्या एका महिन्यात 15 टक्क्यांने भाजीपाला व खाद्यपदार्थातच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळेच गेल्या एका महिन्यात मिर्चीच्या भावात 287 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, अशीच वाढ इतर खाद्यवस्तूमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे. वांग्याची किंमत 51, कांदा 40, टोमॅटोच्या किमतीमध्ये 10 टक्क्याने वाढ झाली आहे. तर एक किलो बटाट्यासाठी लोकांना 200 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच, श्रीलंकेत आयात कमी झाल्याने येथे दुध पावडर मिळणे मुश्कील झाले आहे.

2019 सालाच्या तुलनेत येथील भाव हे दुप्पटीने वाढले आहेत. तर 2020 या वर्षाच्या तुलनेत विचार केल्यास 37 टक्क्यांनी भावात वाढ झाली आहे. यामुळे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांनी घर चालवणे कठिण झाले आहे. वाढत्या खाद्यपदार्थांच्या किमतीमुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केली असून खाद्यपदार्थांचे भाव निश्चित करण्याचे अधिकार आता लष्कराला देण्यात आले आहे. यामुळे लष्कराकडूनच सरकारने ठरवलेल्या भावात किती किमतीने खाद्यमाल नागरिकांना मिळावा हा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.

Vegetable prices rise in Sri Lanka
गोव्यात भाजपची ताकद वाढली; सांस्कृतिक मंत्र्यांचा अखेर पक्षात प्रवेश

दरम्यान, श्रीलंका सरकारची तिजोरी कंगाल झाली असून विदेशी मुद्रा अत्यंत कमी झाली आहे. या देशाचे अर्थकारण हे पर्यटनावर चालते ते कोरोनामुळे बंद पडण्यात जमा झाले आहे. त्यात कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला पैसा खर्च करावा लागला. तसेच, सरकारी खर्चात वाढ झाल्याने करामध्ये सुद्धा कमी आल्याने सर्वच कमाईचे साधने डबघाईस आले आहे. त्यामुळे आज श्रीलंकेवर ही आर्थित आणीबाणी जाहीर करण्याची वेळ ओढावली आहे. जागतिक बॅंकेच्या म्हणन्यानुसार या कोरोना काळात येथील सुमारे 5 लाख लोक हे गरिबीच्या रेषेखाली गेले आहेत. देशावर ही वेळ येऊ शकते याबाबतची शंका विरोधी पक्षाचे नेते आणि अर्थतज्ञ हर्ष डीसिल्वा यांनी याआधीच व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in