जमावाच्या दगडाने फुटलेले नाक पुसत इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, ‘मी मागे हटणार नाही...’

पंजाबमधील (Panjab) गुरुदासपूरमध्ये जमावाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवणे ही त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चून मानली जात आहे.
Indira Gandhi
Indira Gandhi Sarkarnama

पुणे : पंजाबमधील (Panjab) गुरुदासपूर जवळील एका पुलावर ४ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांचा ताफा २० मिनिटे अडकून पडल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे. ही घटना म्हणजे सुरक्षेतील गंभीर चूक मानली जात आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाने पंजाब राज्य सरकारला जबाबदार धरले असून गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पंजाब सरकारवर देशभरातून टीका केली जात आहे. पण ही पहिली घटना नाही, यापूर्वीच्या पंतप्रधानांच्या इतक्या जवळ जाऊन विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर हल्लेही झाले आहे.

Indira Gandhi
बिगुल वाजणार! विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीवर जमावाने दगडफेक केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रॅलीदरम्यान सुरक्षा धोक्यात आली होती. ही घटना आहे 1967 सालची. त्यावेळी देशात निवडणूकीचे वारे वाहत होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत होत्या. इंदिरा गांधी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये प्रचारासाठी गेल्या असताना रॅलीत भाषण करत असताना जमावातील काही समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली.

इंदिरा गांधी स्टेजवरुन भाषण करत होत्या. अचानक समोरच्या जमावातून कोणीतरी त्यांच्या दिशेने दगड भिरकावला आणि तो त्यांच्या नाकाला लागला. हे पाहून सुरक्षा कर्मचारी आणि कार्यक्रमाचे आयोजकही घाबरले. लोक त्यांना कार्यक्रम सोडून जाण्यास सांगू लागले. पण इंदिरा गांधींनी त्या समाजकंटकांसमोर हार मानली नाही आणि त्या तिथेच उभ्या राहिल्या. 'मी मागे हटणार नाही, म्हणत समोरुन दगडफेक होत असतानाही त्यांनी माईक हातात घेत आपले भाषण पूर्ण केले.

Indira Gandhi
DGPसंजय पांडेंना पदावरुन काढणार? उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

या घटनेबाबत द डेली इलिनी वृत्तपत्राने 9 फेब्रुवारी 1967 रोजी प्रकाशित केलेल्या आपल्या लेखात लिहिले आहे की, स्टेजवरुन बोलत असताना पण इंदिरा गांधींनी त्या बदमाशांसमोर हार मानली नाही आणि तिथेच उभ्या राहिल्या. अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांना तुम्हाला मतदान करायचे आहे का? असा थेट सवालच इंदिरा गांधींनी केला होता.

त्याचवेळी त्यांच्यावर समोरच्या जमावातून कोणीतरी विटेचा तुकडा भिरकावला आणि तो त्यांच्या नाकावर आदळला. त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना स्टेज सोडण्याची विनंती केली. मात्र इंदिरा गांधीनी कोणाचेच ऐकले नाही.

The Daily Illini
The Daily Illini

हातातल्या रुमालाने नाकातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारा थांबवत त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. जमावासमोर निरडतेने उभे राहत त्या म्हणाल्या, पंतप्रधान म्हणून मी देशाचे प्रतिनिधित्व करते. पण आज बदमाशांनी माझा नव्हे तर देशाचा अपमान केला आहे.

त्यानंतर नाकाची दुखापत घेऊनच त्या कोलकत्यात पोहचल्या. कोलकत्यातही त्यांनी सभा पूर्ण केली. त्यानंतर त्या दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांच्या नाकाचा एक्स-रे करण्यात आला. त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होते आढळून आले. डॉक्टरांना त्याच्या नाकावर शस्त्रक्रियाही करावी लागली.

30 जुलै 1987 रोजी देशाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी भारत-श्रीलंका शांतता करारासाठी श्रीलंकेला गेले होते. त्यावेळी श्रीलंकेत तामिळ आणि लष्कर यांच्यात संघर्ष सुरू होता आणि भारताकडून श्रीलंकेत लष्कर पाठवण्यास विरोध होता. त्यावेळी राजीव गांधी यांच्यावर गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी सैनिक विजिता रोहन विजेमुनी याने राजीव गांधींवर बंदुकीच्या बटने हल्ला केला. नंतर या सैनिकाला श्रीलंकन ​​सैन्यातून बडतर्फ करण्यात आले. पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणानंतर राजीव गांधींवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

विजिता रोहन भारतीय सैन्याला श्रीलंकेत पाठवण्याच्या विरोधात होता. या विरोधामुळे त्याने राजीव गांधींच्या पाठीवर बंदुकीच्या बटाने हल्ला केला. या हल्ल्यात राजीव गांधी किरकोळ जखमी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com