‘मला काही नको; आमच्या पक्षासाठी निधी द्या’ : कार्यकर्त्याच्या ‘प्रहार’ने अधिकारी घायाळ!

भोर-वेल्ह्यात पक्षनिधीच्या नावाखाली सरकारी अधिकाऱ्यांकडून पैशाची वसुली
Party Fund Froud
Party Fund FroudSarkarnama

खेड-शिवापूर (जि. पुणे) : भोर (Bhor) आणि वेल्हे तालुक्यात एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता विविध सरकारी यंत्रणांकडे पक्षासाठी निधीची मागणी करून स्वतःची पोळी भाजून घेत आहे. खुशीने पक्षनिधी (party funds) दिला तर ठीक नाहीतर विविध मार्गांनी या सरकारी यंत्रणांवर ‘प्रहार’ करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्याकडून केला जात आहे. त्यामुळे स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्या या एका पक्षाच्या कार्यकर्त्याची भोर आणि वेल्हे तालुक्यात सध्या जोरदार चर्चा आहे. (In Bhor-Velhe, money was recovered from government officials in the name of party funds)

सामाजिक कार्यकर्त्याची उपाधी आपणच आपल्या नावासमोर लावायची. त्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारी यंत्रणामधील वेगवगळी प्रकरणे बाहेर काढायची. त्या बदल्यात संबंधितांसोबत मांडवली करून मलई खायची. मलई दिली तर ठीक नाहीतर समोरच्याची रीतसर तक्रार करून त्याला अडचणीत आणायचे, असे प्रकार या कार्यकर्त्याकडून भोर आणि वेल्हे तालुक्यात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मलई घेतल्याबद्दल कुठे भोबाटा होऊन नये; म्हणून त्या मलईला पक्षनिधी असे गोंडस नाव त्याने दिले आहे. अशा प्रकारे पक्षाला निधीच्या नावाखाली हा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता स्वतःची पोळी भाजून घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही तालुक्यांतील अनेक सरकारी यंत्रणांना या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याच्या असामाजिक कामाचा अनुभव येतो आहे.

Party Fund Froud
आमदार संग्राम थोपटेंची बिनविरोध निवड : जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्‌ट्रीक!

या सामाजिक कार्यकर्त्याच्या उचापतीला भोर आणि वेल्हे तालुक्यातील अनेक सरकारी यंत्रणामधील लोक वैतागले आहेत. मात्र त्यांचेही हात दगडाखाली अडकल्याने या कार्यकर्त्याविरोधात कोणीही उघडपणे बोलत नाही. तसेच, त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे या सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे हा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता सुसाट सुटला आहे, त्यामुळे या सुसाट सुटलेल्या स्वयंघोषित कार्यकर्त्याला चाप कोण लावणार? असा प्रश्न सध्या भोर-वेल्हे तालुक्यात आहे.

Party Fund Froud
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

एखादे सरकारी प्रकरण बाहेर काढायचे. त्याबदल्यात संबंधित सरकारी अधिकाऱ्याला विचारणा करायची. अधिकारी अडचणीत असल्यास अमुक करीन, तमुक करीन, तुमच्या वरिष्ठ कार्यालयात तक्रार करेन, पत्रकारांना माहिती देईल, अशा पोकळ धमक्या द्यायच्या. मग ‘जाऊ द्या साहेब, तुमचं काय असेल ते सांगा आपण करू,’ असे संबंधित अधिकारी म्हटल्यावर मग ‘मला काही नको आमच्या पक्षासाठी पक्ष निधी द्या,’ असे सांगून पक्षनिधीच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घ्यायची, असा या स्वयंघोषित कार्यकर्त्याचा एकूण प्रकार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in