तीन महिन्यांत सरकार पाडले, तर पुढची निवडणूक लढवणार नाही : मुनगंटीवारांचे आव्हान

आपले आमदार सोडून जाऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकासंदर्भात विधान केले आहे, असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.
Sudhir Mungantiwar-jayant Patil
Sudhir Mungantiwar-jayant PatilSarkarnama

मुंबई : राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार पडणार आणि राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार, यावरून मोठा गदारोळ उडाला आहे. सरकार पडण्यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात जुंपली आहे. जयंत पाटील यांनी तीन महिन्यांत सरकार पाडून दाखवावे. सरकार पडले तर मी पुढची निवडणूक लढवणार नाही. सरकार पडले नाही तर जयंत पाटलांनी निवडणूक लढवू नये, असे आव्हान दिले आहे. (If government is overthrown in three months, I will not contest next election : Sudhir Mungantiwar)

आगामी हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार पडणार, असा दावा विरोधी पक्षेनते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डीतील अधिवेशनादरम्यान केला होता. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘मध्यावधी निवडणुकांना तयार राहा,’ असे आवाहन केले आहे.

Sudhir Mungantiwar-jayant Patil
पुणे जिल्ह्यातील बलाढ्य शक्तीला आम्ही जागा दाखवणार : हर्षवर्धन पाटलांचा इशारा कोणाकडे

उद्धव ठाकरेंच्या आहवानानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेते शिवसेनेवर तुटून पडले आहेत. आपले आमदार सोडून जाऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले आहे, असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के म्हणाले की उर्वरीत शिवसेना टिकविण्यासाठी आणि कार्यकर्ते आपल्याकडे ठेवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत.

Sudhir Mungantiwar-jayant Patil
अजितदादांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला दुसऱ्या दिवशी दांडी; नाराजीची चर्चा

दुसरीकडे, सरकार पडणार यावरून मुनगंटीवार आणि जयंत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. जयंत पाटील यांनी तीन महिन्यांची मुदत घेऊन सरकार पाडून दाखवावे. तीन महिन्यांत जर हे सरकार पडले, तर पुढची निवडणूक मी लढवत नाही. सरकार तीन महिन्यांत पाडले नाही तर जयंत पाटील यांनी पुढची निवडणूक लढवू नये, असे आव्हान मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांना दिले आहे.

Sudhir Mungantiwar-jayant Patil
शिवसैनिक गुंडच; पण... : विजय शिवतारेंचे विधान

मुनगंटीवार यांच्या आव्हानावर बोलताना जयंत पाटील यांनी काहीसा सावध पवित्रा घेतला. मी कुठं म्हटलंय की मी सरकार पाडणार आहे. सरकार पडणार आहे, असे मी म्हटलंय. पा आणि प मधील फरक मुनगंटीवार यांना समाजावून सांगावा. मी पाडणार आहे, असे म्हटलेलंच नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in