मी २०२४ च्या निवडणुकीत निवडून येणार...कसा येणार ते मात्र माहीत नाही!

पुरोगामी लोकांच्या सल्ल्यावरून महाआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण ....
मी २०२४ च्या निवडणुकीत निवडून येणार...कसा येणार ते मात्र माहीत नाही!
Raju ShettiSarkarnama

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : भाजप जाती-धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक एकात्मतेला तडा देऊ पहात आहे; म्हणूनच पुरोगामी लोकांच्या सल्ल्यावरून महाआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केलाय. एकमेकांची कपडे उतरविण्याची भाषा राजकीय टोळीयुध्दात सुरू आहे. समाजाला किळस यायला लागलीय. यामुळे लवकरच मंथन करून चळवळीचे नुकसान होणार नाही, असा निर्णय विचारांती घेणार आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत मी पुन्हा निवडून येणार हे नक्की, असा आत्मविश्वास राजू शेट्टी यांनी प्रकट केला. (I will be elected in the upcoming 2024 elections : Raju Shetti)

'सरकारनामा'च्या विशेष मुलाखतीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, सामाजिक एकात्मतेच्या रक्षणासाठी सर्व घटकांनी एकत्रित येऊन फळी उभारणं गरजेचं होतं; म्हणून काहींनी शेतकऱ्यांना त्रास दिलाय, हे बाजूला ठेवून महाआघाडीचा निर्णय घेतला. पण आता सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. कुणाला चांगलं आणि कुणाला वाईट म्हणणार? विरोधी पक्षात असतात ते शेतकऱ्यांची भाषा बोलतात. शेतकऱ्यांची मते घेऊन सत्तेत गेले की शेतकऱ्यांना विसरतात.

Raju Shetti
कोल्हापुरातील मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘आंदोलन का केलं’ अशी विचारणा केली होती?

सध्या तर एकमेकांची जिरवाजिरवी चालू आहे. जणू राज्यात राजकीय टोळीयुध्द चालू आहे. एकमेकांची कपडे उतरविण्याची भाषा चालू आहे. दुसऱ्याचे कपडे उतरविताना आपणच उघडे झालोत याचेही भान नाही, इतके ते दंग आहेत. हमाम मे सब नंगे है, ह्यांच्यामुळे जनतेची करमणूक होतेय. कोण काय लायकीचे आहे ते जनतेला समजायला लागले आहे. किरीट सोमय्यासारखे लोक ठराविक लोकांनाच लक्ष्य करतात. ते जी तक्रार करत आहेत, ती मी सहा वर्षांपूर्वीच केली होती. मुख्य फरक म्हणजे ते निवडक सहा कारखान्यांची तक्रार करत आहेत. मी सगळ्या ४३ कारखान्यांची करत होतो. त्यात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे आणि चौकशीला घाबरून भाजपत गेलेल्यांचे कारखाने आहेत. ईडी, प्राप्तीकर विभागाला मी पाठींबा दिला असता पण त्यांचं काम कायदेशीर आणि निरपेक्ष असतं तरच. ठराविकांना भिती घालून आपल्या पक्षात ओढणे, हे चांगलं नाही. ज्या किमतीला कारखाने विकले गेले, त्यामध्ये अधिकची भर टाकून सभासद परत घ्यायला तयार आहेत. त्यासाठी केंद्र सरकार तयार असेल तरच आमचा पाठिंबा असेल, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Raju Shetti
खासदार होताच अवघ्या अडीच वर्षांतच अमोल कोल्हेंवर एकांतवासाची वेळ का आली?

मला आता आमदारकीच्या विषयात कसलाही रस नाही. तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे. मला जनतेनं पाच वर्ष घरात बसविलेलं आहे. तरीही तीन वर्षात जगण्यात फारसा फरक पडलेला नाही. अधूनमधून संसदेत जात होतो, तेवढंच थांबलेलं आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत मी उभा राहणार आणि निवडूनही येणार. कसा येणार ते माहीत नाही. शेतकरी संघटनांचे जुने सहकारी एकत्र येण्यासारखी काहीही घटना घडू शकते. मात्र स्वच्छ चारित्र्याचे आणि स्वच्छ हात असलेले चळवळीतील लोक सोबत आले तरच स्वागत असणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in