मी पवारांचा माणूस हा माझ्यावर ठपका; पण...
sharad pawar_sanjay RautSarkarnama

मी पवारांचा माणूस हा माझ्यावर ठपका; पण...

मी माझ्या पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही.

मुंंबई : माझ्यावर कायमच मी शरद पवारांचा (Sharad Pawar) माणूस आहे, असा ठपका ठेवला जातो. मी पवार साहेबांवर प्रेम केलं; पण माझ्या शिवसेना पक्षाशी कधीही प्रातारणा केली नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तिसरी पिढी आहे, त्यांनाही हे माहीत आहे की मी माझ्या पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. (I was always accused of being Sharad Pawar's man; But ... : Sanjay Raut)

शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राऊत यांनी सांगितले की, आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. तो आम्ही लपवलेला नाही. निवडणूक आली की खोमिनी तयार होतात. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारला आहे.

भाजपला का लांब ठेवला? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष एक धर्माचे लांगुलचालन करत होती, तेव्हा हिंदुत्वाचे वारे वाहत होते. हिंदुत्ववादी मताचे विभाजन होऊ नये, यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे लोक हिंदुत्वासाठी काम करत होते. पण, भाजपचे ते हिंदुत्व आता राहिलेले नाही. आता भाजपचं निवडणुकीपुरतं हिंदुत्व आहे.

sharad pawar_sanjay Raut
तटकरेंची मनधरणी आणि लाडांचे राजीनामानाट्य दोन दिवसांतच संपुष्टात!

कोणी काय खायचं, किती खायचं हे तुम्ही कसं ठरवता. हे आम्हाला पटत नाही. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. आता तो भाजप राहीला नाही. हिंदुत्व म्हणून जवळ घ्यायचं आणि आम्हाला संपवायचं, हे भाजपचं धोरण आमच्या लक्षात आले आहे. युतीत 25 वर्ष आम्ही सडलो, हे उद्धव ठाकरे त्या चिडीतूनच म्हणाले होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, युतीत आम्ही सडलो, तेव्हा वाटलं आता थांबलं पाहिजे. मनातील वेदना समोर येते, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक ती भूमिका पुढे घेऊन जातो, असेही राऊत म्हणाले.

sharad pawar_sanjay Raut
नाना पटोले बारामती मतदारसंघात आले आणि कोड्यात बोलून गेले!

तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात येणार का याबाबत आमच्या पक्षातही शंका होती. आमदारांमध्ये अस्वस्थता होती. कुणाला माहीत नव्हतं, काय सुरु आहे ते. पण, मी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहीत होतं काय चाललं होते ते. शिवसेनेत मला आणि उद्धव ठाकरेंना माहीत होतं आम्ही काय करतोय आणि काय चाललं आहे. आमच्या फक्त मोजकंच बोलणं होत होतं, अशी माहिती महाविकास आघाडी सरकार बनविण्यामागील गोष्टी उलगडल्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in