'वाळू माफियांवर कारवाई करू...पण आमदारांनी सोडण्यासाठी फोन करू नये'

बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना रजेवर पाठविण्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा; जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची १५ दिवसांत बैठक
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama

मुंबई : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नमिता मुंदडा यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला. तसेच, वाळू माफियांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात येतील. मात्र, अशी कारवाई केल्यानंतर माफियांना सोडण्यासाठी आमदारांनी फोन करू नये, अशी टिप्पणीही गृहमंत्र्यांनी या वेळी बोलताना केली. (Home Minister Dilip Walse Patil promises to take action against sand mafias)

बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच, बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक १५ दिवसांत घेऊन त्यांच्या भावना जाणून घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

Dilip Walse Patil
फोटोशूटसाठी गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कौटुंबिक जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार करण्यात आला होता. ज्यांनी गोळीबार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु आहे, जशी स्पष्टता येईल, तशी आणखी कारवाई करण्यात येईल.

Dilip Walse Patil
सभासद ज्यांच्या हाती ‘विठ्ठल’ देतील, त्यांनाच मदत करणार : पवारांनी केली भूमिका स्पष्ट!

केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही त्यांच्यावर उद्‌भवलेल्या प्रसंगाचे कथन केले. स्थानिक पोलिसांनी त्यांची तक्रारही दाखल करुन घेतली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांची तक्रार दाखल करुन घेतली नसेल तर संबंधित पोलिस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करु, असे आश्वासन दिले.

Dilip Walse Patil
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता

बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या गुंडगिरीबद्दल अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनीदेखील वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, वाळूचे अवैध उत्खनन हा संपूर्ण राज्याचा विषय आहे. वाळू माफियांवर निर्बंध आणण्याच्या दृष्टीकोनातून गृहखाते गंभीर असून कठोर कारवाई करण्यात येईल. या विषयवारील चर्चेत नाना पटोले यांनी वाळू माफियांचा उल्लेख केला. नाना पटोले यांचे म्हणणे मान्य करत वाळू माफियांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही वळसे पाटलांनी दिली. मात्र, अशी कारवाई केल्यानंतर आमदारांनी माफियांना सोडण्यासाठी फोन करू नये, अशी टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com