‘बस्स करून दाखवलं!’ : महाडिकांच्या पाठीवर राजू शेट्टींची शाबासकीची थाप

धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा एक कोल्हापूरकर म्हणून आनंद : राजू शेट्टी
‘बस्स करून दाखवलं!’ : महाडिकांच्या पाठीवर राजू शेट्टींची शाबासकीची थाप
Dhananjay Mahadik-Raju ShettiSarkarnama

कऱ्हाड : राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha Election) जवळचा अन्‌ जिल्ह्यातील धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) निवडून आल्याने त्याचा कोल्हापूरकर (Kolhapur) म्हणून आनंद झाला आहे, अशा भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून खासदार महाडिक बाहेर जात असतानाच माजी खासदार शेट्टी तेथे आले. त्यावेळी खासदार महाडिक यांनी वाहन थांबवून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी शेट्टी यांनी त्यांना मिठी मारून व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. (Happiness of Dhananjay Mahadik's victory as a Kolhapurkar : Raju Shetti)

नवनिर्वाचित खासदार महाडिक कऱ्हाड येथे आले होते. त्यावेळी त्यांची व माजी खासदार शेट्टी यांची योगायोगाने भेट झाली. त्यावेळी दोघांनी एखमेकांना अलिंगन देत विचारपूस केली. बस्स करून दाखवलं, असे म्हणत शेट्टी यांनी महाडिक यांचे अभिनंदन केले. माजी खासदार शेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्या जिल्ह्यातील उमेदवार निवडून आल्याने आनंद झाल्याची भावना शेट्टी यांनी व्यक्त केली. शेट्टी म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आमच्या जवळचा व जिल्ह्यातील उमेदवार निवडून आल्याने आनंद आहे. धनंजय आमचे मित्र आहेत. आम्ही भाजप आणि महाविकास आघाडीपासून लांब आहोत, स्वतंत्र आहोत. त्यामुळे एका मित्राचा विजय झाल्याने आनंद होतो आहे.

Dhananjay Mahadik-Raju Shetti
धनंजय महाडिकांची खासदारकी भीमा-लोकशक्ती परिवाराला ठरणार 'टॉनिक'!

शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना यापूर्वीच बाहेर पडली आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीत आमचा थेट सहभाग नव्हता. देवेंद्र भुयारने मत दिलं किंवा नाही दिलं याच्याशी आम्हाला घेणे-देणे नाही. तेव्हा स्वाभिमानीचा उल्लेख संजय राऊत यांनी केला, त्यांच्यावर मला आक्षेप आहे. आमदार देवेंद्र भुयार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीएक संबंध नाही. माझा केवळ एवढाच आक्षेप आहे.

Dhananjay Mahadik-Raju Shetti
नवनिर्वाचित खासदार महाडिकांनी महामार्गावरच घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद!

संजय राऊत म्हणाले की, स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयार यांचे मत पडले नाही, असा आरोप करण्यात आला होता. तेव्हा अगोदरच आम्ही स्वाभिमानीमधून आमदार भुयार यांची हकालपट्टी केलेली आहे. महाविकास आघाडीशी असलेले संबंध आम्ही यापूर्वीच तोडलेले आहेत. तेव्हा घोडेबाजाराचा आरोप होत असताना कुठेतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाव घेतले जात आहे, हे काही बरोबर नाही, अशी नाराजीही राजू शेट्टी यांनी दर्शविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in