ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंचा शिक्षकपदाचा राजीनामा

राजीनामाम्याचे कारण मात्र त्यांनी पत्रात नमूद केलेले नाही.
Ranjit Sinh Disale
Ranjit Sinh Disale Sarkarnama

सोलापूर : माढा (जि. सोलापूर Solapur) तालुक्यातील परितेवाडी शाळेतील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Sinh Disale) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. राजीनामाम्याचे कारण मात्र त्यांनी पत्रात नमूद केलेले नाही. डिसले गुरुजी आपल्या पदाचा राजीनामा हा ७ जुलै रोजीच दिला होता. पीएच.डी. मिळविण्यासाठी अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी रजा मागितली होती. मात्र, ते मंजूर होत नसल्याने थेट तत्कालीन शिक्षणमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. (Global Teacher Award winner Ranjit Singh Disley resigns teacher post)

दरम्यान, ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे. राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राजीनाम्यासारखे पाऊल उचलण्यामागे काय कारण असावे, अशी चर्चाही सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.

Ranjit Sinh Disale
बेडरूममधील महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच देशमुखांचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी रणजितसिंह डिसले यांनी सोलापूरच्या शिक्षण विभागाकडे सहा महिन्यांची रजा मागितली होती. त्याला सोलापूर जिल्हा परिषद शिक्षाण विभागाकडून त्रुटी आहेत. कागदपत्र अपूर्ण आहेत, असे सांगून डिसले गुरुजींचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवला होता. त्यावेळी त्यांनी शिक्षण विभागातील काही जण रजा मंजूर करण्यासाठी पैसे मागत असल्याचा आरोप केला होता. पण शिक्षण विभागाकडून पुराव्याची मागणी करूनही ते त्याबाबतचे पुरावे सादर करू शकले नव्हते. त्यावेळी गुरुजींनी शिक्षण विभागाकडे आपला माफीनामा दिला होता.

Ranjit Sinh Disale
'हनीट्रॅप'मधील भाजप नेत्याचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल!

डिसले गुरुजींचा रजेचा वाद थेट तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या कोर्टात गेला होता. शेवटी तत्काली शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना डिसले गुरुजींना रजा देण्याचे आदेश दिले होते. त्यांना डिसले गुरुजींचा रजेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, त्यानंतर तो वाद शमला होता.

Ranjit Sinh Disale
प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त अधिकाऱ्यांना परत बोलवा : महेश लांडगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तत्पूर्वी रणजितसिंह डिसले यांची सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डायट) नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, असा त्या मागचा उद्देश होता. मात्र, त्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये डिसले हे डायटमध्ये गेलेच नाहीत, हे पुढे उघड झाले. त्या कालावधीत त्यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविण्यासाठी तयारी करण्यातच घालवला अशी तक्रार सोलापूरच्या शिक्षण विभागात दाखल झाली हेाती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशी करून तो अहवाल तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी जाहीर केला नव्हता. त्यानंतर तो अहवाल विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी पुन्हा उघड केला आहे. त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाई करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com