अमित शहांची वेळ मुख्यमंत्र्यांना मिळेना.. : गिरीश महाजन तर भेटूनही आले...

अमित शहा (Amit Shah) यांची वेळ मिळत नसल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार लांबल्याची चर्चा!
Girish Mahajan meets Amit Shah
Girish Mahajan meets Amit Shahsarkarnama

पुणेो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघे मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण बुधवारी संध्याकाळी अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. दुसरीकडे माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) हे अमित शहांना आज भेटले. त्या आधीच महाजनांनी खडसे यांचा `करेक्ट कार्यक्रम` लावल्याचे नंतर स्पष्ट झाले.

भेटीचे कारण समजू शकले नसले तरी त्याची अटकळ बांधणे अवघड नाही. अमित शहा यांच्याकडे सहकार खाते आहे. एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ आज राज्य सरकारने बरखास्त केले. तेथे भाजपचे आमदार आणि महाजन समर्थक मंगेश चव्हाण यांना प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्याची माहिती महाजन यांनी शहा यांना दिली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Girish Mahajan meets Amit Shah
भाजपच्या इतर आमदारांना मंत्रीपदाची प्रतिक्षा; पण इकडे मंगेश चव्हाणांना 'लॅाटरी!'

दुसरीकडे शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला आहे. त्यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. अमित शहांच्या मान्यतेशिवाय हा विस्तार होणार नाही. तरी शहा याबाबत सध्या कोणत्याही घाईत नसल्याचे चित्र आहे. महाजन यांच्याकडून संभाव्य नावांविषयी चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये काय सुरू आहे, नवीन सरकारविषयी काय प्रतिक्रिया आहेत, याचाही अंदाज या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Girish Mahajan meets Amit Shah
ओबीसी, पूरग्रस्त आणि संजय राऊत.. यावर फडणवीस यांची महत्वाची घोषणा

मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे शिंदे आणि फडणवीस सांगत असले तरी अद्याप त्यावर भाजप श्रेष्ठींची चर्चा न झाल्याने सारेच गाडे अडले आहे. त्यातून शिंदे गटातही अस्वस्थता आहे. आता महाजन यांच्याकडे अमित शहांनी काय निरोप दिला किंवा महाजन यांनी शहांना काय रिपोर्टिंग केले असेल, यावर अनेक समीकरणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com