Congress News : चार वर्षात राज्यात काँग्रेसवर मोठे आघात; हे नेते गेले काळाच्या पडद्याआघाड...

MP Balu Dhanorkar News : बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेसची मोठी हानी झाली आहे.
Raosaheb Antapurkar, Chandrakant Jadhav, Rajiv Satav, Balu Dhanorkar
Raosaheb Antapurkar, Chandrakant Jadhav, Rajiv Satav, Balu DhanorkarSarkarnama

Balu Dhanorkar Passed Away : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे (47) मंगळवारी निधन झाले. धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेसची मोठी हानी झाली आहे.

सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे किडनीशी संबंधित आजारामुळे त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी सुरुवातीला नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना दिल्लीला हलवण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालावली. मागील चार वर्षात काँग्रेसच्या चार मोठ्या नेत्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे राज्यात पक्षाची मोठी हानी झाली.

Raosaheb Antapurkar, Chandrakant Jadhav, Rajiv Satav, Balu Dhanorkar
Balu Dhanorkar News : लोकहितासाठी आक्रमक होणारे खासदार धानोरकर कायम स्मरणात राहतील !

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. रावसाहेब अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात मोठा धक्का बसला.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे (Congress) आमदार चंद्रकांत जाधव यांचेही कोरोनामुळेच निधन झाले होते. जाधव यांच्यामुळे काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यात मोठी हानी झाली. जिल्ह्यात चांगले संघटन आणि उद्योजग असलेल्या जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्याचेही मोठे नुकसान झाले. उद्योजकांच्या आणि खेळाडूंच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती.

राजीव सातव यांचेही कोरोनामुळेच निधन झाले होते. 45 वर्षीय सातव हे कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. ते काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी होते. राजीव सातव 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेतही विजयी झाले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीची प्रभारीपदाची जबाबदारी सातव यांच्यावर होती. त्यांनी त्या निवडणुकीत चांगले यश मिळवले होते.

Raosaheb Antapurkar, Chandrakant Jadhav, Rajiv Satav, Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Passed Away : अशोक चव्हाणांच्या व्हायरल कॉलने धानोरकरांना काँग्रेसचे तिकिट मिळाले अन् इतिहास घडला...

राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेसचा लढवय्या नेता हरपला. या लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे काँग्रेसला मोठे आघात सहन करावे लागले आहेत. आता बाळू धानोरकर यांच्या रुपाने पक्षाला आणखी एक आघात सहन करावा लागला आहे. राजीव सातव यांच्या प्रमाणेच 2019 च्या मोदी लाटेमध्ये महाराष्ट्रात धानोरकर यांच्या रुपाने एकमेव खासदार मिळाला होता.

मात्र, या युवा नेत्यांच्या निधनामुळे राज्यात काँग्रेसला मागील चार वर्षात मोठे नुकसान झाले आहे. लढण्याची आणि पक्षाला पुन्हा नवी उभारी देण्याची जिद्द असणाऱ्या नेत्यांच्या अचाणक जाण्यामुळे पक्षाची महाराष्ट्रात मोठी हानी झाली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com