Budget Session : फडणवीसांची मोठी घोषणा : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर; शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार

Maharashtra Budget Session: केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा
Maharashtra Budget Session
Maharashtra Budget SessionSarkarnama

Mumbai News: केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात जाहीर केली. याशिवाय शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येईल, अशीही घोषणा त्यांनी केली. (Fadnavis' big announcement: Namo Shetkari Mahasanman Fund Scheme announced)

जगद्‌गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून ‘टिकवावे धन, ज्याची आस कर जन’ या तत्वाला अनुसरून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या घोषणांचा पाऊस पाडला.

Maharashtra Budget Session
Assembly Session News: पन्नास खोके अन्‌ बिल्कुल ओके...नागालॅंड ओके...! : विधानसभेत गुलाबरावांनी काढली राष्ट्रवादीची कुरापत

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर मी राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करतो. या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत सहा हजार रुपयांची भर घालण्यात येणार आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा फायदा राज्यातील १ कोटी १५ लख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी ६ हजार नऊश कोटी रुपये रक्कम प्रस्तावित केली आहे.

याशिवाय शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार नाही. त्याऐवजी राज्य सरकार तो हिस्सा भरणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येईल. त्यासाठी ३ ३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.

Maharashtra Budget Session
Assembly Session News: शेतकरीप्रश्नावर विधानसभेत प्रचंड गोंधळ; गदारोळातच मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विरोधकांचा सभात्याग

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

शिवराज्यभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये

आंबेगाव (ता. हवेली, जि. पुणे) शिवाजी महाराज संकल्पना उद्यान निर्मितीसाठी ५० कोटी

मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती येथे सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येतील, त्यात शिवाजी महाराजांची जीवनगाथा उभारणार २५० कोटी

किल्ले शिवनेरीवर जीवसंग्रहालय व किल्ले संवर्धनासाठी ३५० कोटी रुपये

भारत विकसित राष्ट्र व्हावे ही संकल्पना. १ ट्रीलीयन डॉलर्सचा महाराष्ट्राचा वाटा. आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापाना. मित्र ही संस्था स्थापन.

Maharashtra Budget Session
Maharashtra Budget Session : नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रवींद्र धंगेकर यांचा शपथविधी!

पाच ध्येयावर आधारित अर्थसंकल्प

पंच अमृत

१) शाश्वती शेती-समृद्ध शेतकरी

२) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व समाज घटकांचा विाकस

३) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

४)रोजगार निर्मिती-सक्षम, कुशल रोजगार युवा

५) पर्यावरणपूरक विकास

- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार

- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत

- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना

- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार

- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार.

केवळ 1 रुपयांत पीकविमा

- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून

- आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता

- शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा

- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com