बंडानंतर एकनाथ शिंदेंचे प्रथमच ट्विट; उद्धव ठाकरेंना दिला अप्रत्यक्ष हा इशारा !

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत...बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.
Eknath Shinde tweet Today, Eknath Shinde Latest News, Political News
Eknath Shinde tweet Today, Eknath Shinde Latest News, Political News Sarkarnama

मुंबई : शिवसेनेत बंड केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रथमच भाष्य केले आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख आहे. मात्र, शिवसेनेचे विद्यमान नेतृत्व असलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा नामोल्लेखसुद्धा करण्यात आलेला नाही, त्यामुळे शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला एक प्रकारे इशारा देत बंडावर कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. (Eknath Shinde's tweet of first time after the rebellion)

Eknath Shinde tweet Today, Eknath Shinde Latest News, Political News
विधानभवनात पोचताच उद्धव ठाकरेंनी विचारले होते ‘एकनाथ कुठे आहेत?’

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत...बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे...बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्यावर इशारा दिला आहे. (Eknath Shinde Latest News)

विशेष म्हणजे या ट्विटमध्ये शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा उल्लेख केला आहे. मात्र, उद्वव ठाकरे यांचे नावही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये घेतलेले नाही, त्यामुळे त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध बिडल्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब होत आहे. या ट्विटमधून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपबरोबर जाण्याचा एकप्रकारे सूचित केले आहे.

Eknath Shinde tweet Today, Eknath Shinde Latest News, Political News
ठाकरे सरकार पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे सूचक विधान

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की आम्हाला बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. सत्तेसाठी आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही, असे सांगून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Eknath Shinde tweet Today, Eknath Shinde Latest News, Political News
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे अमित शहा?; दिल्लीतील बैठकीनंतर सूत्रे हलली

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा अर्थ शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बोलणी फिस्टकली आहेत, असाही घेतला जात आहे. ठाकरे हे आता शिवसेना भवनात जाऊन शिवसैनिकांशी बोलणार आहेत. तेथे ठाकरे काय भूमिका काय घेणार, यावर एकनाथ शिंदे आपले धोरण ठरविणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपण सत्तेसाठी प्रतारणा करणार नसल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटवरून शिवसेनेचे नाव हटविल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com