Supreme Court Hearing : बहुमत नसतानाही एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली : ॲड. नीरज कौल यांचा युक्तीवाद

उद्धव ठाकरे गटाला प्रत्येक निर्णय कोर्टाकडूनच हवा आहे
Supreme Court Hearing
Supreme Court HearingSarkarnama

नवी दिल्ली : शिवसेनेकडे (shivsena) बहुमत नसतानाही आमदारांच्या (MLA) गटाकडून एक व्हीप काढण्यात आला. त्याच व्हीपच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) हकालपट्टी केल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकिल ॲड. नीरज किशन कौल यांनी युक्तीवादाच्या दरम्यान केला. (Eknath Shinde was expelled despite not having the majority: Adv. Argument by Neeraj Kaul)

विधानसभा उपाध्यक्षांनी २५ जून रोजी अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर मागितलं. 'त्या' बैठकीनंतर अपात्रतेची नोटीस मिळाली. बहुमत नसताना ठाकरे गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून २९ जुलै रोजी बहुमत चाचणीला मान्यता देण्यात आली. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा युक्तीवाद शिंदें गटाकडून नीरज किशन कौल यांनी केला आहे.

Supreme Court Hearing
Supreme Court Hearing : शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही : ॲड. अभिषेक मनु संघवींचा युक्तीवाद

ठाकरे गट प्रत्येक प्रकरण कोर्टात घेऊन येतंय. राज्यपालांच्या निर्णयालाही त्यांनी आव्हान दिलंय. आमदारांची अपात्रता, उपाध्यक्षांचा राजीनामा सर्वच मुद्दे कोर्टात आणले आहेत, असेही कौल यांनी युक्तीवादात म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही, असेही कौल यांनी स्पष्ट केले आहे.

Supreme Court Hearing
Supreme Court Hearing : शिंदे गट कोणत्या भूमिकेत निवडणूक आयोगाकडे गेला : सुप्रीम कोर्टाचा सवाल

शिंदे गटातील सदस्यांना पक्षातून काढल्याचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं का? नीरज कौल यांच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे गटाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘पक्षातून नव्हे तर पदावरुन काढल्याची माहिती’ न्यायालयाच्या प्रश्नाला ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी उत्तर दिले. दरम्यान, बहुमत नसताना ठाकरे गटाकडून व्हीप जारी केल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलाने केला आहे.

Supreme Court Hearing
सोपलांच्या कारखान्याची थकीत एफआरपी बजरंग सोनवणे देणार; पण...

अपात्रतेसंदर्भातील याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्यावर कोणताही निर्णय न घेण्याच्या विनंतीवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले. त्या याचिका प्रलंबित असताना आमदार किंवा खासदाराला निवडणूक आयोगाकडे जाण्यास मनाई केली जाऊ शकते. पण, ते सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, असे कौल यांनी म्हटले आहे. त्यावर अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत कोणताही परिणाम होणार नाही, अशी टिप्पणी खंडपीठाने केली आहे.

Supreme Court Hearing
आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक !

आमच्याकडे बहुमत आहे आणि आम्ही अद्याप पक्षाचे सदस्यत्व सोडलेले नाही. हे सभापतींनी ठरवायचे की स्वेच्छेने सदस्यत्व सोडायचे, हे इतर गट ठरवतील. पक्षचिन्ह ही आमदाराची मालमत्ता नाही, तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. ते वापरण्याचा कायदेशीर अधिकार शिंदे गटाला आहे, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला आहे.

घटनात्मक संस्था असल्यानं निवडणूक आयोगाला या प्रकरणी निर्णयाचा अधिकार आहे. विधिमंडळ आणि राजकीय बहुमत विचारात घेण्याचा निर्णय आयोगाचा आहे, असेही नीरज कौल यांनी म्हटलेले आहे. आमच्या बहुमताबाबत अध्यक्ष किंवा दुसरा गट कसा निर्णय घेऊ शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com