ठाकरे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तीन हजार कोटी घेतले : माजी जिल्हाप्रमुखांचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या डोक्यात झोपेत धोंडा घातला आहे.
Sainath Abhangrao
Sainath AbhangraoSarkarnama

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे सरकार पडण्यासाठी ३००० कोटी घेतले आहेत. तसेच, प्रत्येक आमदाराने ५० कोटी घेतले आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे (Shivsena) पंढरपूर विभागाचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी केला. (Eknath Shinde took Rs 3,000 crore to overthrow Thackeray government : Sainath Abhangrao)

सोलापूर जिल्ह्यातील चारही जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत अभंगराव यांनी वरील खळबळजनक आरोप केला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे या चार जिल्हाध्यक्षांसह सोलापूरचे शहरध्यक्ष गुरुशात धत्तुरगावकर, महेश धाराशिवकर तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील, पदाधिकारी, जिल्हा उपप्रमुख तालुकाप्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Sainath Abhangrao
अनिल परबांनी माझ्याविरोधात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला बळ दिलं : बंडखोर योगेश कदमांचा घाणाघात

साईनाथ अभंगराव म्हणाले की, शिवसैनिकाला आता पेटून उठल्याशिवाय भाग नाही. शिवसेना संपली नसून शिवसेना पुन्हा उभारणार आहे. शिवसैनिकांनी एकत्र येऊन जे जे गद्दार आहेत, त्यांना धडा शिकवावा. यापूर्वी अनेकजण शिवसेना सोडून गेले. तरीही शिवसेना पुन्हा उभारली. पुन्हा सत्तेत आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या डोक्यात झोपेत धोंडा घातला आहे. शिवसैनिकांनी पुन्हा एकत्र यावे, गाव वाड्या वस्त्या पिंजून काढाव्यात आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा दीडशे आमदार निवडून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

Sainath Abhangrao
तानाजी सावंतांचा २४ तासांत ठाकरेंना झटका; सोलापूर शिवसेनेचा मोठा गट शिंदेंच्या गोटात!

मोहोळचे उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार यांनी सर्व शिवसैनिकांना एकत्रित राहण्याचे आवाहन केले. अजय दासरी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी येथे असताना पंढरपूरमधील मेळावा नेमका कोणाचा आहे. मुख्यमंत्री तेथे कोणाचा मेळावा आयोजित करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दीपक गायकवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही पदाधिकारी हे फिरत्या रंगमंचाप्रमाणे आहेत. जिथे सत्ता तिथे ते हजर आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. खरा शिवसैनिक हा मातोश्रीशी इनाम राखतो. उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानतो. सर्व तालुक्यातील पदाधिकारी हजर आहेत. येथे सर्व शिवसेना पदाधिकारी हजर असताना पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मेळाव घेतल्याचे सांगत आहेत. तेथे नेमके कोणते शिवसैनिक आहेत, असा सूर महिला आघाडीच्या संघटिका अस्मिता गायकवाड, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, गुरुशांत धत्तरगावकर यांनी व्यक्त केला.

Sainath Abhangrao
एकनाथ शिंदे गटाचे पंढरपुरात शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

कारखान्यातील कामगार शिवसैनिक म्हणून बसवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल करत एका पदाधिकाऱ्याने पंढरपूरच्या एका कारखान्यातील कामगार शिवसैनिक म्हणून समोर बसवले आहेत. काही वारकरी आणि कामगारांनाच शिवैनिक म्हणून पुढे करत हा शिवसेनेचा मेळावा आहे, असे बंडखोरांकडून दाखवले जात आहे, असे साईनाथ अंभगराव यांनी सांगितले.

सर्व दाढीवाले गद्दार नाहीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शहाजी पाटील, शिवाजी सावंत हे सर्व दाढीवाले आहेत. मात्र, सर्वच दाढीवाले बंडखोर नाहीत. कुर्डूवाडीचे धनंजय डिकोळे व मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, असे स्वतःच्या दाढीला हात लावून गुरुशांत धत्तुरगावकर यांनी सांगताच बैठकीत एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com