अजितदादा, त्यावेळी तुम्ही जरा घाईच केली : मुख्यमंत्र्यांचा टोमणा

मला आठवतंय दादा, जयंतराव त्यावेळी बोलले होते, की चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. फेल झाला नसता.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : अजितदादा (Ajit Pawar), तुम्ही जरा घाई केली, त्यावेळेस (पहाटेचा शपथविधी). थोडं सबुरीनं घेतलं असतं, तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा? अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिमटा काढला. (Chief Minister Eknath Shinde taunts Ajit Pawar over the early morning swearing-in ceremony)

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी टोमणे मारतच आपले भाषण गाजवले. संपूर्ण विधानसभेला त्यांनी पोट धरून हसायला लावले.

Eknath Shinde
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराची मुख्यमंत्र्यांची घोषणा; विधानसभेची मंजुरी

ते म्हणाले की, दादा, त्यावेळेस तुम्ही थोडं सबुरीनं घेतलं असतं, तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा? (या वाक्यावर खुद्द अजित पवारांसह शेजारील जयंत पाटील यांनीही हसून दाद दिली) जयंतरावही हसतात. मला आठवतंय दादा, जयंतराव त्यावेळी बोलले होते, की चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. फेल झाला नसता, बोल्ले का नाही तुम्ही मला? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना विचारला. पण, दादा, तुम्ही थोडीशी घाई केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले, तेवढ्यात समोरून कोणीतरी म्हणाले की तो कार्यक्रम करेक्ट झाला असता तर तुम्ही इकडच्याच (विरोधी बाकावर) बाकावर बसला असता. त्यावर मुख्यमंंत्री म्हणाले की, ‘त्यावर काहीतरी मार्ग निघाला असता.’ त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

Eknath Shinde
झारखंड : मुख्यमंत्री अडचणीत; विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस

पहाटेच्या शपथविधीवेळी मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि म्हणाले की, तुम्ही टीव्ही बघितली का? मी टीव्ही बघितली होती. पण म्हटलं मागचं कधीचं दाखवात की काय? फडणवीससाहेबही दिसले. आमचे प्रमुख मला म्हणाले की, जयंतरावांनाही मी फोन करतोय. पण ते फोन उचलत नाहीत. त्यावर मी बोललो की, जयंतरावही तिथे आहेत. कारण अनिल पाटील त्या ठिकाणी होते, ते पाठमोरे उभे होते. ते पाठीमागून जयंतरावांसारखे दिसले, त्यामुळे मी आमच्या प्रमुखांना सांगितलं की जयंतरावही तिकडे गेले आहेत. पण, ते तिकडे गेले नव्हते. परंतु तिकडे गेले असते तर कार्यक्रम ओका झाला असता, अशी कबुलीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde
'अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केली'

महाविकास आघाडीच आपण बांधली होती मोट।

मुख्य बसले होते घरी, तुम्ही चालवत होता बोट ।।

अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, अजितदादा, तुम्ही मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला होता. श्रद्धा आणि सबुरीनेच आम्ही वागत आहे. तुमचं बोलणं, वागणं, वेळापत्रक याबाबत आम्ही तुमचं कौतुक करत असतो. दादा सकाळी बरोबर वेळेवर येतात. एकदा मला त्यांनी पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावले होते. आता आठ वाजता मी कसं येणार? कारण मी झोपतोच पहाटे चार वाजता. पण, तुमच्याबद्दल मला आदरही आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच आम्ही काम केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com