एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा असा ठरला फॉर्म्युला?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या तर त्यावर कोणा कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना असणार आहे.
Eknath Shinde -Amit Shah
Eknath Shinde -Amit ShahSarkarnama

दिल्ली : दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी (ता. २२ सप्टेंबर) रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली आहे. या वेळी राज्यातील राजकीय स्थितीबरोबरच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या जागांबाबत चर्चा झाली असून भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी सहा जागा मिळण्याची शक्यता या भेटीनंतर वर्तविण्यात येत आहे. (Eknath Shinde mett Amit Shah; This is the formula of 12 MLAs appointed by the Governor)

मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. पहिल्या दिवशी त्यांनी शिवसेनेच्या इतर राज्यातील नेत्यांसोबत चर्चा करून एक संमेलनही घेतले. तसेच, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांचीही भेट घेतली, तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कायदामंत्र्यांससोबतही चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde -Amit Shah
MNS :"..जोतिषी नेमणे आहे ; मनसेनं उडवली शिंदे गटाची खिल्ली ; डोंबिवलीमध्ये झळकली रस्त्यांची 'कुंडली'

राज्यातील राजकीय परिस्थितीवर या दोघांमध्ये चर्चा झाली असावी. तसेच, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बारा जागांपैकी भारतीय जनता पक्षाला सहा, तर एकनाथ शिंदे यांच्या गटलाही सहा जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजारो मिळू शकलेला नाही.

Eknath Shinde -Amit Shah
मोदींना अपशब्द बोलणारे कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अडचणीत, गुन्हा दाखल !

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या तर त्यावर कोणा कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट ग्रामीण आणि शहरी भागाला किती जागा देणार, हेही पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे सध्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडणारे रामदास कदम यांना संधी मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in