एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून तूर्त अभय; नेतेपदी कायम!

मुंबईत शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (shivsena) राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांना अभय देत शिंदे यांचे नेतेपदावरील निवड कायम ठेवलेली आहे. याशिवाय रामदास कदम यांनाही नेतेपदावर कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समितीच्या बैठकीत सहा ठराव करण्यात आले असून त्यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही, या प्रमुख ठरावाचा समावेश आहे. (Eknath Shinde gets protection from Shiv Sena; Will remain in the leadership position)

मुंबईत शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना नेतेपदावर कायम ठेवून त्यांना अभय देण्यात आलेले आहे. याशिवाय पक्षविरोधी कारवाईमुळे चर्चेत आलेले रामदास कदम यांच्यावरही पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. एकीकडे बंडखोरांना अभय देताना १६ आमदारांवर अपात्रेतची कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देण्यात आलेले आहे.

Eknath Shinde
पुण्यात शिवसेनेला धक्का : कट्टर पदाधिकाऱ्याने धरली एकनाथ शिंदे गटाची वाट!

या कार्यकारिणीमध्ये सहा ठराव करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि ती कायम राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर राष्ट्रीय कार्यकारिणीचा विश्वास, पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांना असतील. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिकार देण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही, हा महत्वाचा ठराव या बैठकीत करण्यात आलेला आहे. तशी मागणी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. याशिवाय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला. असे सहा ठराव या बैठकीत करण्यात आलेले आहेत.

Eknath Shinde
छाटछूट हल्ल्याला आम्ही घाबरत नाही; करारा जवाब मिलेगा : सावंतांकडून शिवसेनेला प्रत्युतर

दरम्यान, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस माजी खासदार आनंद अडसूळ, माजी मंत्री रामदास कदम गैरहजर होते. याच बैठकीत सोळा आमदारांचे निलंबन करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, संजय राऊत, सुधीर जोशी, अनंत गीते, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com