Nilesh Lanke's Warning : ‘मला मागचा नीलेश लंके व्हायला लावू नका’ : आमदार लंकेंनी कोणाला दिला इशारा...

ते तहसीलदार म्हणतात आमच्यावर लय दबाव आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

पुणे : आमची सत्ता गेल्यानंतर अधिकारी जरा वेड्यासारखं करायला लागले होते. मी म्हटलं मला मागचा नीलेश लंके व्हायला लावू नका. आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. पण आमच्याकडे जशास तसे उत्तर असते. आमची पाया पडायची, हात जोडायची तयारी आहे आणि वेळप्रसंगी बाह्या वर करायचीही तयारी आहे. तुम्ही एक पाऊल वाकडं टाकला, तर आम्ही दोन पावलं वाकडी टाकणार, हेही तुम्हाला सांगतो, असा इशारा आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिला. ('Don't make me be the previous Nilesh Lanke': MLA Lanke)

माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके (नगर Nagar तालुका) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्या सभेत बोलताना आमदार लंके यांनी विरोधक तसेच अधिकाऱ्यांना इशारा दिला.

Nilesh Lanke
Market Committee Election : नगर बाजार समितीत प्रत्येक शेतकऱ्याला मोफत नाश्ता : नीलेश लंकेंची घोषणा

आमदार लंके म्हणाले की, आम्ही सत्तेचा सर्वसामान्यासाठी वापर केला. पण, आता सत्तेचा गैरवापर केला जात आहे. तहसीलदाराला फोन करून तर सांगितलं जातंय की त्याचा क्रशर सील करा. आम्ही तहसीलदारला म्हणतोय की, त्याच्याकडे सर्व कागदपत्रं आहेत, तर ते तहसीलदार म्हणतात आमच्यावर लय दबाव आहे. मनात असं वाटतंय की, त्याच्या डोक्यात दगड घालावं की काय. अरे तुझ्यावर दबाव आहे म्हणून एखाद्याचा संसार उदध्वस्त करशील ना.

Nilesh Lanke
Rajan Salvi News : सामंतांविरोधात लढणार का? : राजन साळवी म्हणतात, ‘मरेपर्यंत मी राजापूरमधूनच निवडणूक लढवणार...’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार आणि मी एका क्रशरच्या उद॒घाटनाला गेलो होतो. उद्‌घाटनाची फित कापली आणि दुसऱ्या दिवशी त्या क्रशर चालकाला दहा कोटींच्या दंडाची नोटीस आली. मी त्या तहसीलदारला फोन केला आणि म्हणालो, ‘क्रशर काल सुरू झालं आहे आणि दहा कोटींचा दंड कसा.’ त्यावर ते तहसीलदार म्हणाले, ‘आता मी काय करू, माझ्यावर लय दबाव आहे.’ ‘काय करायचं’ असं मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले, ‘नोटिशीला स्थगिती घ्यायची असेल तर २५ टक्के दंड भरावा लागेल,’ असेही लंके यांनी नमूद केले.

Nilesh Lanke
Nilesh Lanke News : होय, ईडीवाले माझ्याकडे आले आणि येडे होऊन गेले : ईडी चौकशीच्या चर्चेवर नीलेश लंकेंचे भाष्य

आपल्याला काय हिशेब कळंत नाही, त्यामुळे त्याला म्हटलं भरून टाका २५ टक्के दंड. त्यावर तो म्हणाला, काय येडाबिडा झालाय की काय. पंचवीस टक्के म्हणजे अडीच कोटी रुपये. मी तर डोक्यालाच हात लावला. त्यामुळे सत्तेचा किती गैरवापर केला जात आहे. दाखवलं असं जातंय की सगळं आम्हीच करतो. मी माझ्या मतदारसंघात किती पैसे आणले हे मी दाखवतो. तुम्ही किती आणले ते दाखवा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com