Narayan Rane News : राणेंना अडचणीत आणणारा 'तो' पीए कोण? 'मोदीही म्हणाले होते त्यांना आधी हाकला...'

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या पीएने अडचणीत आले होते अशी चर्चा सुरु आहे
Narayan Rane, Narendra Modi
Narayan Rane, Narendra ModiSarkarnama

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. 'तुमच्या पीएला आधी हाकला अन्यथा तुमचे मंत्रिपद काढून घेईल', अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायण राणे यांना झापले, असा दावा राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता राणे यांचा तो पीए कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

विनायक राऊत (Vinayak Raut) हे कणकवलीमध्ये नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी हा धक्कादायक दावा केला होता. राऊत म्हणाले होते, नारायण राणे यांच्याकडे असलेल्या एका पीएने अनेकांना गंडे घातले. मात्र, हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) कळले तेव्हा मोदींनी राणेंना समज दिली. त्या पीएला आधी हाकला अन्यथा तुमचे मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दात राणेंना पंतप्रधानांनी झापले'', असा दावा राऊत यांनी केला होता.

Narayan Rane, Narendra Modi
Dattatray Bharane : राष्ट्रवादीतल्या गटबाजीवर दत्तात्रय भरणे म्हणाले, 'पक्षाची ताकद मोठी म्हणून...'

''काही दिवसांपूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये केरळच्या खासदाराने लोकसभेत एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना नारायण राणेंची भंबेरी उडाली होती. केरळच्या खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला तेव्हा राणेंनी कानाला हेडफोन लावले होते. त्यामध्ये त्या प्रश्नाचे हिंदीत भाषांतर करण्यात आले''.

Narayan Rane, Narendra Modi
Hingoli News: भाजपला दावा सांगू द्या, आम्हाला काही बोलायचे नाही असे आदेश आहेत..

''मात्र तरी देखील त्यांना प्रश्न समजला नाही. त्यांना प्रश्न केरळबाबत विचारला पण ते तामिळनाडू संदर्भात बोलत होते. यावेळी प्रश्नाला भलतच उत्तर देत त्यांची फजिती झाली. मात्र, तेव्हापासून नारायण राणे आजपर्यंत लोकसभेची पायरी चढले नाहीत'', असे विनायक राऊत म्हणाले होते. मात्र, त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राणे यांचा नेमका तो पीए कोण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com