नगरपंचायतींच्या निकालात दोन रोहितचा बोलबाला!

अवघ्या २३ वर्षांच्या रोहित पाटलांनी नगरपंचायतीची निवडणूक जिंकत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे.
Rohit Pawar-Rohit Patil
Rohit Pawar-Rohit Patilsarkarnama

पुणे : राज्यातील १०६ नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये अनेकांनी आपले गड राखले असले तरी अनेकांच्या वर्चस्वाला सुरूंगही लागला आहे. पण, या निकालात दोन रोहित यांनी मिळविलेल्या विजयाची मोठी चर्चा राज्यात आहे. त्यात माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (rohit patil) यांनी एकहाती सत्ता मिळवली, तर आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी विधानसभेला सुरू केलेली विजयी घौडदौड कायम राखली आहे. या दोघांनी मिळवलेला विजय हे निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. (Discussion of victory of Rohit Pawar and Rohit Patil in Nagar Panchayat election results)

नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक समीकरणे असतात, त्यामुळे त्या बहुतांश वेळा स्थानिक पातळीवर लढल्या जातात. पण यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी प्रचाराला निवडणुकीत रंग भरले होते. अगदी काही मंत्र्यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले होते. विशेषतः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रचाराला जाऊनही अपेक्षित असे यश मिळू शकले नाही.

Rohit Pawar-Rohit Patil
सेनापतीला दाखवून द्यायचं होतं की मावळ्यांनी गड राखलेला आहे...

सांगली जिल्ह्यातील कवठे-महांकळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्र आले हेाते. विशेषतः राष्ट्रवादीतील एक गटही त्यांच्याविरोधात उभा ठाकला होता, त्यामुळे तशी ही निवडणूक सोपी नव्हती. पण, या सर्वांना पुरून उरत रोहित पाटील यांनी नगरपंचायतीच्या १७ पैकी १० जागा जिंकत आपणही कच्चा गुरुचा चेला नाही, हे दाखवून दिले. खरं तर या निवडणुकीत विरोधकांकडून आर. आर. पाटील यांचा उल्लेख करण्यात आला. तोच धागा पकडून रोहित यांनी ‘१९ जानेवारीच्या निकालात तुम्हाला माझा बाप आठवेल,’ असा इशारा दिला होता आणि तो त्यांनी खरा करून दाखवला. अवघ्या २३ वर्षांच्या रोहित पाटलांनी नगरपंचायतीची निवडणूक जिंकत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे.

Rohit Pawar-Rohit Patil
रोहित पवारांचीच सरशी; राम शिंदे जवळपासही नाहीत

विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविणारे आमदार रोहित पवार यांनी विजयी घौडदौड कायम राखली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांना धोबीपछाड देत आमदार पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पॅनेलने कर्जत नगरपंचायतीच्या १७ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीने १२, काँग्रेसने ३ जागा जिंकल्या आहेत. अवघ्या दोन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. कर्जत नगरपंचायतीवर यापूर्वी राम शिंदे यांची सत्ता होती. ती उलथून टाकत रोहित पवार यांनी मतदारसंघावर आपली मांड पक्की ठोकली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com