देशमुख बंधूंबद्दल प्रकाश आंबेडकरांचे भाकीत खरे ठरणार? 'भारत जोडो' यात्रेमध्ये नसल्याने चर्चा

Bharat Jodo Yatra News : काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेची देशात चर्चा सुरू आहे.
Bharat Jodo Yatra News
Bharat Jodo Yatra News Sarkarnama

Bharat Jodo Yatra News : काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेची देशात चर्चा सुरू आहे. देगलूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होऊन या यात्रेला तीन दिवस झाले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे बडे नेते, पदाधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले आहे. ते राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी होत आहेत. मात्र, नांदेडच्या शेजारीच असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), त्यांचे आमदार बंधु धीरज देशमुख हे अद्याप भारत जोडो कडे फिरकलेले नाहीत.

यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. देशातील नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आणि तिही मराठवाड्यात असताना सुद्धा काँग्रेसचे तरुण नेते असलेले देशमुख बंधु यात्रेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या विधानाचिही चर्चा होत आहे.

Bharat Jodo Yatra News
Bharat jodo : राज्यभरातील काॅंग्रेसचे नेते नांदेडमध्ये, पण शेजारच्या लातूरचे देशमुख बंधु मात्र गायब..

प्रकाश आंबेडकर यांचा नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी धम्म मेळावा झाला होता. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधळा होता. काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील, असा टोला अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांचे नाव न घेता लगावला होता. देशमुख बंधु नेमके यात्रेच्या स्वागातालाही ते उपस्थित नसल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

अमित देशमुख, धीरज देशमुख व लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी फिरकले नाहीत. याबद्दल आता कुजबुज सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षात चव्हाण विरुद्ध देशमुख असा अंतर्गत वाद आणि संघर्षाची किनार तर या अनुपस्थितीमागे नाही ना? असे देखील बोलले जाते. नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेवर अशोक चव्हाण यांचा सर्वाधिक प्रभाव असल्यामुळे देशमुखांनी इथे येणे टाळल्याचीही चर्चा होत आहे.

विशेषत: सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देगलूरच्या भाषणात अशोक चव्हाण यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे जाहीर कौतुक केले होते. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील नेते व माजी मंत्री सतेज पाटील व विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते व विविध वैद्यकीय सेवा पुरविणारी पथकेही इथे कार्यरत असताना मराठवाड्यातीलच नांदेड शेजारच्या जिल्ह्यांतील पक्षाचे महत्वाचे राजकीय घराणे असलेले देशमुख बंधू इथे नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटत आहे.

Bharat Jodo Yatra News
Bharat Jodo : `अरे बघतो कोण अडवणार`, खणखणीत आणि दणदणीत मराठी गाणे लॉंच

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात जेव्हा यात्रा पोहचेल तेव्हा तिथे दोन्ही देशमुख बंधु हेजरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत एकीकडे राहुल गांधी हे भारत जोडोचा संकल्प घेऊन देशभरात पायपीट करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेत्यांमध्ये असलेला बेबनाव या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. खरच देशमुखांच्या मनात काही आहे, याची चर्चा जोरदार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in