काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी...ते फुटणार की... : शहाजीबापूंच्या बॉम्बगोळ्याने खळबळ

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सात मते फुटली हेाती. त्याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कबुली दिली आहे.
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीपासून काँग्रेसमधील (congress) काही आमदार (MLA) पक्षांतर करणार असल्याची चर्चा वारंवार होत आहे. त्यबाबत शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनीही भाष्य केले आहे. काँग्रेसचे राज्यातील आमदार फुटणार की नाही, याबाबत मला काहीही माहिती नाही. पण, काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांमध्ये नाराजी आहे, असे विधान आमदार पाटील यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Discontent among Congress MLAs : Shahajibapu Patil)

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सात मते फुटली हेाती. त्याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कबुली दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची सात मते फुटली होती. त्यामुळेच हंडोरे यांचा पराभव झाला, असे त्यांनी सांगितले हेाते. तसेच खुद्द हंडोरे यांनीही आमच्या पक्षातील काही लोकांनी मला निवडणुकीत पाडलं, असा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांचे विधान महत्वाचे मानले जात आहे.

Shahajibapu Patil
CEO आयुष प्रसादांचीच चौकशी करा : वाबळेवाडी पालकसभेचा ठराव शिंदे-फडणवीसांना देणार

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष निवडीच्या वेळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही काही आमदार गैरहजर राहिले हेाते. तर काही आमदार उशिरा पोचले होते. त्यात एका माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्याची गंभीर दखल घेत एका नेत्याला फोन करून त्याबाबतचा जाब विचारला होता. तेव्हापासून काँग्रेस आमदारांबाबत राज्यात चर्चा होत आहे.

Shahajibapu Patil
आमदार सचिन कल्याणशेट्टींनी लक्षवेधी मांडताच फडणवीसांनी केली मोठी घोषणा

काँग्रेसचे राज्यातील आमदार फुटणार आहेत का, असा प्रश्न आमदार पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आमदार फुटणार आहेत की नाही, हे मला माहिती नाही. पण त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, हे त्यांनी सांगितले होते. तानाजी सावंत यांच्यावर दौऱ्यावर होणाऱ्या टीकेलाही शहाजीबापूंनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राज्याचे आरोग्य मंत्री हे निष्क्रीय नव्हे तर कार्यक्षम मंत्री आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. आमदार पाटील हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते, त्यामुळे त्यांचे आजही त्या पक्षात मित्र आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com