Gunaratna Sadavarte : वळसे-पाटील तुमची पाटीलकी आता संपलीय : जयश्री पाटील

जमिनीसंदर्भात तक्रार केल्याने आमच्यावर सूड उगवला जातोय. पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून सदावर्ते यांना टार्गेट केले जात आहे.
Jayashree Patil
Jayashree PatilSarkarnama

मुंबई : जमिनीच्या गैरव्यवहारसंदर्भात आम्ही जी तक्रार मलबार हिल पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) माझा सुमारे १०० पानांचा जबाब लिहून घेतला आहे. त्याचा बदला घेण्यासाठीच ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर हा वैयक्तीक हल्ला करण्यात आलेला आहे. पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून सदावर्ते यांना टार्गेट केले जात आहे. पण, शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) ही तुमच्या घरची जहॉगिरी नाही, ही तुमची पाटीलकी नाही. तुमची पाटीलकी संपलेली आहे, असा आरोप ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ॲड जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी केला आहे. (Dilip Walse-Patil Your Patilki is now over: Jayashree Patil)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री अटक केली आहे. त्यांना आज (ता. ९ एप्रिल) न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Jayashree Patil
Silver Oak Attack : पवारांना पितृस्थानी मानता अन्‌ वकिली फडणवीसांची करता..? हे दुर्दैवी!

जयश्री पाटील म्हणाल्या की, आम्ही दिलेल्या तक्रारीचा बदला घेण्यासाठीच ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हा वैयक्तीक हल्ला करण्यात आलेला आहे. ही लोकशाही नाही, जेव्हा हा प्रकार घडला, तेव्हा सदावर्ते हे न्यायालयात होते. असे असतानाही केवळ आम्हाला टार्गेट करण्यासाठी हा डाव मांडलेला आहे. पोलिस यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत आहे. पण, संविधानाचे राज्य आहे. माझ्या भारत मातेमध्ये हे तुमचा हा भ्रष्टाचार चालू देणार नाही. काहीही झालं तरी आम्ही लढणार. माझे पती सदावर्ते यांना ज्या पद्धतीने तुम्ही टार्गेट केले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की तुम्ही हे मोगलाईप्रमाणे राज्य करण्याचा प्रयत्न करत आहात. या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या समोर आणलेल्या आहेत.

Jayashree Patil
‘मातोश्री’वर हल्ला करायचा होता; म्हणजे काय किंमत मोजावी लागली असती, ते कळले असते!

ज्या फिर्यादीनुसार ॲड. गुणवर्ते यांना अटक करण्यात आलेली आहे. तसा कोणताही व्हिडीओ उपलब्ध नाही. जर हल्ल्यासंदर्भातील वाक्य आमच्या तोंडचं असेल तर आम्ही जामीन अर्ज आजच मागे घेतो. पण ते याबाबत व्हिडीओ सादर करू शकलेले नाहीत. हे फक्त गुणवर्ते यांना टार्गेट करण्यासाठीच रचलेले कुभांड आहे. सदावर्ते आणि आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. जे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज शंभर कोटीच्या आरोपाखाली कारागृहात आहेत, तेच काम विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुढे चालवत आहेत. जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भातील ५०० पानांची तक्रार मी केलेली आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी हा मोगलाईप्रमाणे कारभार चालवलेला आहे. त्याच्याविरोधात आम्ही लढत राहणार आहोत. सोमवारी ते काय पुरावे सादर करतात, हे आम्ही बघून घेऊ, असेही जयश्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in