राष्ट्रवादी प्रवेशाआधी नीलेश लंकेंनी अजितदादांसाठी धरला होता हट्ट!

आम्हाला लागलेले आयुष्यभराचं ग्रहण अजित पवार यांनी काढले आहे.
Ajit Pawar_Nilesh Lanke_dhananjay munde
Ajit Pawar_Nilesh Lanke_dhananjay mundeSarkarnama

पुणे : हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आम्ही नगर जिल्ह्यातील पारनेरला होता. त्या कार्यक्रमाला अजित पवार येणार हे निश्चित झाले होते आणि नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ठरलेला होता. पण, पवार यांना कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने रायगडला जावे लागले. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला अजितदादा येणार नाहीत, हे जेव्हा लंके यांना कळाले, तेव्हा ते पुणे-नगर फाट्यापासून पुढे पारनेरला यायलाच तयार नव्हते. आम्ही सांगितलं, ‘आम्ही सर्वजण आहोत’, त्यावर लंके म्हणाले की, तुमचा काही उपयोग नाही. अजितदादा असतील तरच माझा प्रवेश. नाही तर नाही, असा त्यांनी हट्टच धरला. शेवटी कसं तर अजितदादांचं लंके यांच्याशी बोलणं करून दिलं. त्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि आज नीलेश लंके राष्ट्रवादीचे आमदार आहेत, असा किस्सा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सांगितला. (dhanannjay munde say, Nilesh Lanke insisted presence of Ajit Pawar at NCP joining program)

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री मुंडे बोलत होते. ते म्हणाले की, आमदार शेळके यांच्या वाढदिवसासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ देणे हे साधं सोप्प नाही. पण, वाढदिवसाला हजेरी लावण्यापेक्षा कोरोनासारख्या काळातसुद्धा मावळ तालुक्यासाठी ७५६ कोटी रुपयांचा निधा दिला. याच्यासारखं वाढदिवसाचं दुसरं कुठलंचं मोठं गिफ्ट असू शकत नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार शेळके यांना ते मिळाले आहे.

Ajit Pawar_Nilesh Lanke_dhananjay munde
कोल्हापुरात सतेज पाटील-महाडिक पुन्हा रंगणार सामना; तर सोलापुरात परिचारकांविरोधात कोण?

‘‘अजितदादा, कधी कधी आमच्याही वाढदिवसाला हजेरी लावली तर बरं होईल,’’ अशी अपेक्षा व्यक्त करत मुंडे म्हणाले की, तसं तुमच्या आशीर्वाने काही कमी नाही, याची आम्हाला जाणीव आहे. ही गोष्ट खरी आहे की सुनील शेळके आणि आम्ही पूर्वी एका पक्षात (भाजप) होतो. पण तो इतिहास आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र आहोत, हे भविष्य आहे. कदचित मावळच्या जनतेला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. येथे तीन सूर्य आहेत, ज्यांना ग्रहण लागले होते. त्यात पहिला मी, दुसरे नीलेश लंके आणि तिसरे सुनील शेळके. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर विश्वास टाकला, त्यामुळे आम्ही तिघेही आज येथे आहोत. आम्हाला लागलेले आयुष्यभराचं ग्रहण अजित पवार यांनी काढले आहे.

Ajit Pawar_Nilesh Lanke_dhananjay munde
मोदीजी आता अंबाजोगाईत भाजपचा एकही नगरसेवक येणार नाही हे आव्हान स्वीकारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. माझाही एकदा नाही तर दोनवेळा पराभव झालेला आहे, तर सुनील शेळके यांना तर राष्ट्रवादीत करण्याआधीच विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली होती, असंही धनंजय मुंडे म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com