धनंजय मुंडेंना गुरूसमोर पदाचा पडला विसर : दर्शन घेऊन जमिनीवरच बसले

पदाने राज्याचे कॅबिनेट मंत्री असले तरी अंगी कायम नम्रता जपणारे नेते म्हणून धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांची वेगळी ओळख आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

परळी ( जि. बीड ) - पदाने राज्याचे कॅबिनेट मंत्री असले तरी अंगी कायम नम्रता जपणारे नेते म्हणून धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांची वेगळी ओळख आहे. आज परळी येथील ब्रम्हमुनी प्रा. डॉ. सुग्रीव काळे यांच्या सत्कार प्रसंगी याची पुन्हा एकदा प्रचिती आली. ( Dhananjay Munde forgot his position in front of Guru: He took darshan and sat on the ground )

वैद्यनाथ कॉलेज मध्ये अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा केलेले काळे दाम्पत्य संबंध परळीकरांना परिचित आहे. ब्रम्हमुनी प्रा. डॉ. सुग्रीव काळे यांच्या वयाच्या 85 वर्ष पुरती निमित्त त्यांचा विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता. परंतु धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्या मुळे त्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्यांनी आज काळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन काळे दाम्पत्याचा सन्मान केला व आशीर्वाद घेतले.

Dhananjay Munde
धनंजय मुंडे भाग्यवान, असे पंकजा का म्हणाल्या?

धनंजय मुंडे हे स्वतः देखील काळे दाम्पत्याचे वैद्यनाथ महाविद्यालयात असताना विद्यार्थी राहिलेले आहेत. भेटी वेळी धनंजय मुंडे यांनी ब्रम्हमुनी यांचे दर्शन घेतले व तिथेच जमिनीवर बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या.

Dhananjay Munde
Video : संघर्षातून खलनायकाचा नायक झालो; धनंजय मुंडे

ब्रम्हमुनी प्रा. डॉ. सुग्रीव काळे यांनी आर्य समाज प्रसार, प्राध्यापक म्हणून केलेली सेवा, विविध विषयांवर केलेले लिखाण आदी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्याला व आठवणींना यावेळी उजाळा मिळाला; यावेळी जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, चंदूलाल बियाणी, सूर्यभान नाना मुंडे, डॉ. मधुसूदन काळे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com