महाडिकांना आणखी एका अपक्ष आमदाराचा पठिंबा मिळणार; विजयाबाबतही केला दावा!

धनंजय महाडिक यांना आमदार रवि राणा यांचा पाठिंबा मिळणार, हे उघड गुपीत आहे.
Dhananjay Mahadik-Ravi Rana
Dhananjay Mahadik-Ravi RanaSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना आणखी एक अपक्ष आमदार रवि राणा (Ravi Rana) यांचा पाठिंबा मिळणार हे उघड गुपीत आहे. विशेष म्हणजे आमदार राणा यांनी घोडेबाजारावर भाष्य करत भाजपचे उमेदवार महाडिक हेच बहुमतांनी निवडून येतील, असा दावा केला आहे. (Dhananjay Mahadik will get the support of MLA Ravi Rana)

अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार हे आता भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पूर्णपणे गेले आहेत. शिवसेनेच्या विरोधात त्यांनी उघडपणे आघाडी उघडली आहे. त्यामुळे त्यांनी धनंजय महाडिक यांच्यासाठी मोहीम उघडली आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत भाजपचे उमेदवार महाडिक हे मोठ्या मतांनी निवडून येतील, असे म्हटले आहे.

Dhananjay Mahadik-Ravi Rana
गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर अजित पवारांनी दिले हे उत्तर!

आमदार राणा म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येणार आहे. काही अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बोलावले होते. ते शरीरांनी जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले असले तरी मनाने आणि तनाने सर्व अपक्ष आमदार हे देवेंद्र फडणवीस या नेतृत्वासोबत आहेत.

Dhananjay Mahadik-Ravi Rana
राज्यसभा निवडणूक : महाडिकांचे आस्ते कदम.. भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार!

राज्यसभा निवडणुकीबाबत मला विश्वास आहे की, भाजपचा राज्यसभेचा उमेदवार बहुमताने निवडून येईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. जे घोडेबाजार चालवत असतील, त्यांना आमचं सांगणं आहे की, घोडेबाजार कोठेही चालला तरी मतं मात्र भाजपला मिळणार आहेत. एवढं नक्की, असा विश्वास आमदार रवि राणा यांनी बोलताना केला आहे.

Dhananjay Mahadik-Ravi Rana
राज्यसभा निवडणुकीबाबत अजितदादांचं सूचक विधान : 'अर्ज सहा की सात, यावर चर्चा सुरू आहे!'

दरम्यान, मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याने दिला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना विरोध केला होता. त्याबाबतचा हाय व्हालटेज ड्राम मुंबईत रंगला होता. त्यानंतर राणा दांपत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधत राजद्रोहाचे कलम लावण्यात आले होते. त्यानंतर ते १४ दिवस कारागृहात होते. त्यानंतर त्यांची ओळख देशभरात झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com