मोदींनी दोनवेळा फोन केल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री बनण्यास तयार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत शिंदे यांच्या मंत्रीमंडळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार आहेत, असे सांगितले आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होणार आहेत. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना केली होती. त्यानंतर अगदी थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit saha) यांनी ट्विट करत शिंदे यांच्या मंत्रिमंडळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार आहेत, असे सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी फडणवीस यांना नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी दोन वेळा फोन केला, त्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री बनण्यास तयार झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. (Devendra Fadnavis will now be the Deputy Chief Minister)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्यापेक्षा आपण पक्ष संघटनेत काम करू, असे फडणवीस यांनी पक्षनेतृत्वाला सांगितले होते. त्यामुळे फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होण्यास इच्छूक होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एकदा नव्हे तर दोनवेळा फोन केल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र, खुद्द मोदींनीच दोन वेळा फोन केल्यामुळे फडणवीस हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यपालांना पत्र दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली हेाती. त्यावेळी त्यांनी आपण नव्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, आपण सरकार व्यवस्थित चाललण्यासाठी बाहेर राहून काम करीत राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी आपली स्वतःची इच्छा असल्याचे स्पष्ट केले हेाते. तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचाही तसा आग्रह आहे,’ असे सांगितले होते.

फडणवीसांनी काय घोषणा केली होती?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला असून देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक घोषणा करत पुन्हा एकदा नवा डाव खेळला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत, अशी घोषणा केली आहे. भाजपचे 106, शिंदे गट आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आज राज्यपालांना देण्यात आले. या सरकारला माझे पूर्ण सहकार्य राहील आणि या सरकारला यशस्वी होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com