दिल्ली दौऱ्यात फडणवीस `बॅक सीट`वर; मुख्यमंत्र्यांना केले पुढे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस भाजप नेत्यांच्या भेटिला..
Eknath Shinde-Fadnavis
Eknath Shinde-Fadnavissarkarnama

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपा पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठींसाठी आज दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात फडणवीस हे `बॅकसीट`वर होते.

हे दोन्ही नेते महाराष्ट्र सदनात दाखल झाल्यावर काही मिनिटांतच फडणवीस तेथून बाहेर पडले. ते फारसे काही न बोलता गाडीत बसून निघून गेले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मुख्यमंत्र्यांसह भेटीची वेळ मागण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. ते नड्डा यांच्याकडे गेले असण्याचीही चर्चा आहे. फडणवीस यांनी आजच्या दौऱयात जाणीवपूर्वक बॅक सीट घेऊन मुख्यमंत्र्यांनाच पुढे केल्याचे दृश्य दिसले. विमानतळापासून महाराष्ट्र सदनापर्यंत फडणवीस यांनी माध्यमांशी न बोलण्याचे धोरण ठेवले. जेव्हा मुख्यमंत्री असतात तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी न बोललेले बरे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली. माध्यमांच्या कॅमेऱयांचा सारा फोकस शिंदे यांच्यावर असताना फडणवीस शांतपणे वाट काढत बाजूला जाऊन थांंबले हे दृश्य सूचक होते.

Eknath Shinde-Fadnavis
सेना पुन्हा उभी राहणार नाही, ठाकरे पितापुत्रांनी गप्प राहावे : नारायण राणेंनी मीठ चोळले

रात्री पावणेआठला दोन्ही नेते विमानतळावर उतरले व तेथून सव्वाआठला महाराष्ट्र सदनात आले. दरम्यान विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आज दिल्ली गाठली. त्यांनी आज अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. शिंदे व फडणवीस रात्री सदनात आले त्याच सुमारास नार्वेकर हे सदनाबाहेर पडले.

महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की न्यायव्यवस्था, कायदे यांचा निर्णय देशात अंतिम असतो. आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणेन्याय मिळेल. आपल्या दौऱयात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी `सर्व मुद्यांवर` चर्चा करणार आहोत असेही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde-Fadnavis
उद्धव ठाकरे यांनी मायावतींना फाॅलो केले : मी माझे म्हणणे सांगणार.. ना प्रश्न, ना उत्तरे!

शिंदे यांचे गटनेतेपद कायम ठेवणे आणि भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद पदी नियुक्त करणे, तसेच शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटिसांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ जुलै रोजी (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे. त्याबाबतही दोन्ही नेते भाजप हायकमांडबरोबर चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही राजशिष्टाचार भेट घेतील.

या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यादरम्यान आता सत्ता वाटपाचा पुढचा अॅक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची यादी व खातेवाटपचा प्लॅन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मंजूर करून घेणे, सोमवारच्या सुनावणीबाबत चर्चा करणे हा या दौऱयातील ठळक कार्यक्रम आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर ते व फडणवीस या दोघांनी एकत्रितपणे पंतप्रधानांनीची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही उद्या (रविवारी) दोन्ही नेते भेट घेतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in