राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधीच फडणवीसांचा अपक्ष आमदारांना फोन!

ठाकरे सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांच्या संपर्कात फडणवीस असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
Uddhav Thackeray - Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोन केल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (ता. ६ जून) सायंकाळी अपक्षांसह शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे, त्या बैठकीआधीच फडणवीस यांनी फोन करून अपक्ष आमदारांना राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha Election) भाजप उमेदवाराला मतदान करण्याची गळ घातल्याचे सूत्रांनी सांगितले. (Devendra Fadnavis Phone calls to independent MLAs before CM's meeting)

राज्यसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे पक्षीय पातळीवर प्रयत्न केले जात असताना खुद्द मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. दोन्ही बाजूकडून अपक्षांसह छोट्या पक्षाच्या आमदारांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलेले आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवारही आपापल्या पातळीवर संपर्क साधत आहेत, त्यामुळे राजकीय ज्वर चांगलाच चढला आहे.

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
मोठी घडामोड : धनंजय महाडिकांनी घेतली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट!

राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. सौम्य लक्षणे असल्याने ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. मात्र, गृहविलगीकरणात असूनही फडणवीस यांनी आपले डावपेच आखणे सोडलेले नाही. प्रत्यक्ष भेटीवर मर्यादा असल्या तरी फडणवीस यांनी फोन आणि व्हीसीच्या माध्यमातून आपली संपर्क मोहीम सुरूच ठेवली आहे.

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
शिवसैनिकांनी हिसका दाखवताच सोलापूर बस स्थानकात शिवराज्याभिषेकदिन साजरा झाला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी शिवसेना आणि शिवसेनेच्या सहयोगी आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावली आहे. तत्पूर्वीच फडणवीस यांनी आपला कार्यभाग साधत अपक्ष आमदारांशी संपर्क साधून मोकळे झाले आहेत. ठाकरे सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांच्या संपर्कात फडणवीस असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. फोनवरून अपक्षांशी संपर्क साधत राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
राज्यसभा निवडणूक : डहाणूचे आमदार निकोले यांचा महाआघाडीला पाठिंबा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी वर्षा निवासस्थानी शिवसेना आणि सहयोगी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने आपल्या आमदारांना बॅगा भरूनच बैठकीला येण्याचा आदेश दिला आहे. बैठकीनंतर मतदान होईपर्यंत या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. या आमदारांची व्यवस्था खासदार विनायक राऊत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आमदारांची उद्या हॉटेल ड्रायडंट येथे उद्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com