Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

भाजपमधील इच्छुकांनी फोनचे चार्जिंग उतरू दिले नाही.. फडणवीसांचा नंबर तोंडपाठ झाला!

Shinde-Fadnavis सरकारचा 9 ऑगस्ट रोजी विस्तार

मुंबई : Shinde Cabinet Expansion भाजपमधील कोणत्या नेत्याला घ्यायचे याचा निर्णय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील संभाव्य मंत्र्यांना फोन केले आणि शपथविधीला येण्याचे निमंत्रण दिले. खुद्द फडवणीस यांनी `सागर` बंगल्यावरून सारी सूत्रे हलवली. त्यांच्या फोनच्या प्रतिक्षेत अनेक आमदार होते. अनेकांनी आपला फोन बंद पडणार नाही, याची काळजी घेतली. पण भाजपमधील फक्त नऊ जणांनाच उद्या शपथ दिली असल्याने इतर इच्छुकांचा हिरमोड झाला. स्पर्धेतील अनेकांचा यात समावेश नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांनाही संधी मिळालेली नसल्याने त्यांच्यातही नाराजी आहे.

फोन कधीही येऊ शकतो, या अपेक्षेने अनेकांनी तो बंद पडणार नाही, याची काळजी घेतली. फडणविसांचा फोन नंबरही अनेकांचा या कालावधीत पाठ झाला.

Devendra Fadnavis
राधाकृष्ण विखे-पाटील तातडीने मुंबईला रवाना; मंत्रिमंडळात संधी मिळणार?

शिंदे सरकारमध्ये भाजपकडून नऊ नेत्यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहेत. त्या नऊ नेत्यांना खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीची निमंत्रण दिले. यात १) चंद्रकांतदादा पाटील २) राधाकृष्ण विखे पाटील ३) सुधीर मुनगंटीवार ४) गिरिश महाजन ५) सुरेश खाडे, मिरज ६) अतुल सावे 7)मंगलप्रसाद लोढा 8) रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित अशी नावे अंतिम झाली आहेत. यात मूळ भाजपचे नसलेले विखे आणि गावित यांच्या नावाचा समावेश आहे. त्यातही गावित यांच्या नावबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जयकुमार रावल किंवा इतरांचा समावेश न होता गावितांना पसंती मिळाली आहे. आदिवासी समाजाचा चेहरा म्हणून गावित यांना संधी मिळाली आहे. त्यांच्या कन्या हिना गावित या खासदार आहेत

Devendra Fadnavis
मोठी बातमी : शिंदे गटाचे सामंत, भुसे, भुमरे, सत्तार, देसाई होणार मंत्री; भाजपकडून लोढांना संधी

भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय ठरवणार आहेत, याबाबत आता त्यांच्या समर्थकांना धास्ती वाटू लागली आहे. मुंबई शहरातील प्रभावी नेते म्हणून शेलार यांच्याकडे पाहिले जाते. मात्र त्यांचे नाव पहिल्या विस्तारात नसल्याने शंका व्यक्त होत आहे. त्यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद दिल जाणार असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांचा मंत्रीमंडळातील समावेश पक्का झाल्याने एक व्यक्ती, एक पद या सूत्रानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा आहे. हे रिक्त पद मग शेलार यांच्याकडे देण्यात येईल. मात्र या पदाबाबत स्वतः शेलार फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे 2013 पासून हे पद सातत्याने बिगरओबीसी नेत्यांकडे गेले आहे. सुधीर मुनगंटिवार हे अलीकडच्या काळातील शेवटचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.

त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपद सांभाळले. फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद हे ओबीसी नेत्यांकडे जाईल, याची चर्चा जास्त आहे. शेलार हे मुंबईतील असल्याने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद खरेच जाईल का, याची शंका आहे. तसेच सलग तीन मराठा प्रदेशाध्यक्ष होणे, हे पक्षासाठी योग्य राहणार नाही. ओबीसी हा भाजपचा मोठा मतदार आहे. त्यांच्यातील कोणाला तरी प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. मग शेलार यांना ते पण मिळणार नाही. मंत्रीपदही नाही आणि प्रदेशाध्यक्ष पदाची नुसतीच चर्चा असे शेलारांबाबत घडते आहे की काय, अशी शंका आहे. अमित शहा यांच्याजवळच्या मानल्या जाणाऱ्या शेलार यांच्या राजकीय वर्चस्वाला कोण धक्का देतयं, याची आता चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com