नगरसेवक, जिल्हाप्रमुख ते थेट 'मातोश्री'ला आव्हान देणारे आमदार संतोष बांगर...

Santosh Bangar|Shivsena|Uddhav Thackeray : बंडखोर आमदार संतोष बांगर यांना कसे रोखायचे, असा प्रश्न शिवसेनेला पडला आहे.
Santosh Bangar Latest News
Santosh Bangar Latest NewsSarkarnama

Santosh Bangar : संतोष बांगर हे शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक शिवसेनेसोबत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत.

विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी विधिमंडळात शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला मतदान केलं होतं मात्र, बहुमत चाचणी सिद्ध करत असताना त्यांनी अचानकपणे शिंदे गटाला मतदान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना घेऊन मुंबई गाठत मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देत त्यांचा सत्कार केला आणि थेट 'मातोश्री'ला(Matoshri) डोळे दाखवण्याचे धाडस केलं. यामुळे संपूर्ण राज्याच बांगर (Santosh Bangar) यांनी लक्ष वेधल होत. (Santosh Bangar Latest Marathi News)

Santosh Bangar Latest News
शिवसेनेचे ११ खासदार अमित शहांना भेटले; ठाकरेंना कोंडीत पकडण्याची रणनीती तिथंच ठरली!

बांगर यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याने बांगर चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिले आहे. माझी या पदावर बाळासाहेब ठाकरे यांनी नेमणुक केल्याने या पदावरून मला कोणीही काढू शकत नाही, असे त्यांनी ठाकरेंना ठणकावून सांगितले आणि शिंदे यांचीच खरी शिवसेना म्हणत शिंदेनी आपल्याला जिल्हाप्रमुख म्हणून कायम ठेवल्याचे सांगत खुलेआम ठाकरेंनाच आव्हान दिले. ते इथेच न थांबता त्यांनी थेट मुंबईत जाऊन आपली ताकद दाखवत ठाकरेंना डिवचलं आहे. यामुळे त्यांची राज्यभर चर्चा होत आहे.

बांगर यांचा राजकीय प्रवास...

संतोष बांगर हे मुळ हिंगोली शहरातील रहिवाशी असून जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार म्हणून नेतृत्व करतात. शिवाय ते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणूनही काम पाहतात. 2019 ला त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे डॅा. संतोष टारफे यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला होता.

बांगर यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना नगरसेवक ते आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. ते शेतकरी कुटुंबातून येतात. इतर शिवसेनेच्या नेत्यांसारख्या शाखाप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास झाला नसून ते थेट जिल्हाप्रमुख झाले. प्रथम ते हिंगोली नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांच्या कामची पद्धत आणि आक्रमकता बघता त्यांना शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने 2009 ला त्यांची हिंगोली जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर बांगरांनी आपल्या कामाचा धडाका लावला आणि शिवसेनेची ताकद जिल्हाभर वाढवली. याचीच बक्षिसी म्हणून त्यांना 2019 ला कळमनुरी विधानसभा मतदारसंघातुन तिकीट मिळाले. आणि त्यांनी विजयही मिळवला.

Santosh Bangar Latest News
‘ठाकरे सरकार पडणार, हे शिवसेना आमदाराने चार महिन्यांपूर्वीच सांगितले होते’

जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असतांना बांगर यांनी पक्षाचा विस्तार केला. मात्र, जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघात त्यांचा म्हणावा तसा खास प्रभाव नव्हता. मात्र, 2019 ला शिवसेनेला ताकदीचा उमेदवार नसल्याने कळमनुरी विधानसभा मतदारसंघातुन 'मातोश्री'वरून सर्वांत आधी बांगरांना तिकिट जाहीर झाले होते. यानंतर बांगरांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावत मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांना यानिवडणुकीत विशेष करून युवा वर्गांचा मोठा पाठिंबा मिळाला होता.

बांगर हे शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांची कामे तत्काळ करण्यासाठी जिल्ह्यात ओळखले जातात. शेतकऱ्यांचे कामे होत नसल्यास त्यांनी अनेकदा प्रशासकीय अधिकारी आणि कर्चाऱ्यांशी केलेले वाद चांगलेच गाजलेले आहेत. तसेच कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना रेमडिसिव्हीर इंजेक्शेनसाठी आपली 50 लाखांची एफडी मोडली होती. त्यांच्या या कामांचा आणि आक्रमकपणाचा त्यांना अन् शिवसेनेला फायदा झाला. 2019 च्या लोकसभेला बांगर यांनी शिवसेनेच्या वाढवलेल्या ताकतीच्या जोरावरच शिवसेनेचे उमेदवार आणि आता खासदार असलेल्या हेमंत पाटलांना माजी शिवसेनेचे खासदार पण कॅाग्रेसकडून उभे अससेल्या सुभाष वानखेडेंचा सहज पराभव करता आला.

Santosh Bangar Latest News
`जितेंद्र, त्यांनी वार केले म्हणून आपण कमरेखाली वार केले पाहिजेत असे नाही!`

कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा कॅाग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 ला येथूनच सातव यांनी शिवसेनेते माजी आमदार गजानन घुगे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 ला सातव यांचे समर्थक असलेले डॅा. संतोष टारफे यांनी विजय मिळवला होता. यानंतर घुगे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर 2019 ला भाजप-सेना युतीमध्ये कळमनुरी मतदारसंघ हा सेनेला सुटला अन् बांगरांना संधी मिळाली.

कळमनुरी मतदारसंघात ओबीसी मतदार बहुसंख्य असल्याने येथे ओबीसी उमेदवारांना निवडणूक सोपी जाते त्यामुळेच गजानन घुगे हे वंजारी समाजाचे आणि तर सातव माळी समाजाचे असल्याने त्यांना सहज विजय मिळवता आला असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघात आदिवासी लोकसंख्याही मोठ्याप्रमाणात असल्याने 2014 ला आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले डॅा. टारफे यांना कॅाग्रेसकडून उमेदवारी देत सातव यांनी डाव खेळला आणि घुगेंचा पराभव केला. मात्र, 2019 ला या मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीने उमेदवार दिल्याने कॅाग्रेसची मते विभागली गेली आणि तब्बत 16 हजार 378 मतांनी बांगरांनी विजय मिळवला.

Santosh Bangar Latest News
आता गडकरी-फडणवीस यांनी एकत्र येऊन मोदी-शहांना टक्कर द्यावी!

बांगरांना या निवडणुकीत 82 हजार 515, वंचितचे अजित मगर यांना 66,137 आणि कॅाग्रेसच्या डॅा. टारफेंना 67 हजार 104 मते पडली होती. एकंदरीतच बांगरांना वंचितच्या उमेदवाराचा फायदा झाला अन् विजय मिळवता आला होता. बांगर यांचा या मतदारसंघात म्हणावा तसा प्रभाव नाही. मात्र, बांगर हे देखील वंजारी समाजातून येत असल्याने या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या वंजारी मतांचा त्यांना फायदा झाला.

दरम्यान, शिंदे यांनी बंड केल्यावर बांगर यांनी 'मातोश्री'सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. इतकच काय तर त्यांना बंडखोरांना बोलावतांना अश्रूही अनावर झालेले बघायला मिळाले. त्यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या निर्णयाचे कौतूकही केले होते. शिंदे राज्यात आल्यावर विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुक होईपर्यंतही बांगर हे ठाकरेंशी एकनिष्ठ होते. मात्र, विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी ते शिंदे गटात सामील झाले यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईला जाऊन शक्तीप्रदर्शन केलं आहे. मात्र, त्यांचा हा निर्णय जिल्ह्यातील शिवसैनिकांना आवडला नसल्याचे बोलले जात आहे. मात्र बांगरांना शह देण्यासारखा जिल्हाप्रमुख शिवसेनेपुठे कुणीच दिसत नसल्याने शिवसेनेची मात्र हिंगोलीत कोंडी होत असल्याने बांगरांना चांगलच फावते आहे. यामुळेच बांगरांची 'मातोश्री' अर्थात उद्धव ठाकरेंना डोळे दाखवण्यापर्यंत मजल गेली आहे. बांगरांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय चुकीचा की बरोबर ते आम्ही 2024 ला दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया कळमनुरी मतदारसंघातील शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com