Uday Samant: ‘त्या’ गोष्टींना कंटाळून मी गुवाहाटीला गेलो : उदय सामंतांनी सांगितले कारण...

महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षाकडून शिवसेना कमकुवत करण्याचे कारस्थान : उदय सामंत
Uday Samant News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
Uday Samant News, Shivsena News, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सहयोगी पक्षाकडून सुरू आहे, त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे गेलो आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आसामधून बोलताना दिले. (Conspiracy to weaken Shiv Sena by allies in Mahavikas Aghadi : Uday Samant)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत मातोश्री आणि शिवसेना भवनावरील बैठकांना हजेरी लावणारे उदय सामंत हे परवा गुवाहाटीला शिंदे यांच्या गोटात गेले आहेत. त्यानंतर त्यांच्या चोहोबाजूंनी टीका होत आहे. काही शिवसैनिकांकडून तोडफोडही करण्यात आली आहे. त्यानंतर सामंत यांनी सोशल मीडियावर येत आपण गुवाहाटीला का गेलो, हे सांगितले. (Maharashtra Political Crisis)

Uday Samant News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
Eknath Shinde: एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येऊन घेणार मोठा निर्णय!

मी आजही शिवसेनेतच आहे, असे स्पष्ट करून उदय सामंत म्हणाले की (स्व.) बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाची वाईट नजर लागली आहे. घटक पक्षाच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मी गुवाहाटीमध्ये आलो आहे. रत्नागिरीत काल (ता. २७ जून) शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मला रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचे आहे की, तुम्ही कुणाच्याही गैरसमाजाला बळी पडू नका. मी शिवसेनेनेतच आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना टिकली पाहिजे, त्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. (Uday Samant News in Marathi)

Uday Samant News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
दोन-तीन दिवसांत भाजपचं सरकार येणार! भाजप खासदाराचा मोठा दावा

सामंत म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या निवडणुकीतदेखील हा उमेदवार निवडून येऊ नये; म्हणून मित्रपक्षांनी परफेक्ट बंदोबस्त केला. अशाच पद्धतीने शिवसेना संपविण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत आहेत. या घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जी मोहिम आखली आहे, त्यामध्ये मी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

Uday Samant News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
गुलाबराव पाटील एक फोन येताच घाबरून पळाले!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी, कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com