अशोक चव्हाण, सतेज पाटलांना जे जमलं, ते राष्ट्रवादीला पंढरपुरात का जमलं नाही?

देगलूर अन्‌ कोल्हापूरमध्ये काँग्रेस जिंकली, मात्र पंढरपुरात राष्ट्रवादी का हरली?
अशोक चव्हाण, सतेज पाटलांना जे जमलं, ते राष्ट्रवादीला पंढरपुरात का जमलं नाही?
Ashok chavan-Satej Patil-NCP, Pandharpur political news, Pandharpur Politics, Why the defeat of NCP in Pandharpur?Sarkarnama

सोलापूर : कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार २०१९ मध्ये महाराष्ट्रात जन्माला आले. सरकार विचित्र आणि वेगवेगळ्या विचारांचे आल्याने करेक्ट कार्यक्रम हा ठरलेलाच होता. करेक्ट कार्यक्रम कोणाचा? हा प्रश्न आजही सुटत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये विचारसरणी बदलून एकत्र आलेल्या शिवसेना (shivsena) आणि कॉंग्रेस (congress), सत्तेसाठी स्थिर सरकार देणाऱ्या राष्ट्रवादी (ncp), यापैकी २०२४ ला करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार? याचे गुपित कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूर या तीन जागांवर पोटनिवडणुक झाली. तीनपैकी दोन जागांवर काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने विजय मिळविला. पंढरपूरमध्ये मात्र राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला. सत्तेतील लहान भाऊ दोन्ही जागांवर जिंकतो, राष्ट्रवादी का पराभूत होते. पंढरपुरात राष्ट्रवादीला शिवसेना आणि कॉंग्रेसची मदत मिळाली का? याचा विचार होण्याची आवश्‍यकता आहे. (Congress won in Deglaur & Kolhapur, but why did NCP lose in Pandharpur?)

राज्यात भाजपला विशेषतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दू्र ठेवण्यासाठी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेकडून मनसेकडे आला, शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ घेतल्याने आता शिवसेना संपली, भविष्यात शिवसेनेचे काही खरे नाही, अशीच चर्चा जनमाणसांत सुरू आहे. कोणासोबत गेल्यामुळे कोण संपणार? हे काळच ठरवेल. पण सध्या भाजपला महाराष्ट्रात रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षाच्या आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी ठरताना दिसत आहे. (Pandharpur political news)

Ashok chavan-Satej Patil-NCP, Pandharpur political news, Pandharpur Politics, Why the defeat of NCP in Pandharpur?
पवारसाहेबांना बोलावून नीलेश लंकेंनी माझा अन्‌ अजितदादांचाच 'करेक्ट कार्यक्रम' केला!

देगलूरमध्ये शिवसेनेचे नेते सुभाष साबणे भाजपचे उमेदवार झाले, कोल्हापुरात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पोटनिवडणुकीत थांबविले. तरीही तळागळातील शिवसैनिक पक्षासोबत कायम राहिला. शिवसेनेच्या विचाराची व आदेशाची ताकद यातून अधोरेखित होते. पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार भारत भालके, नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदार संघातील काँग्रेसचे तत्कालिन आमदार रावसाहेब अंतापूरकर व कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे तत्कालिन आमदार चंद्रकांत जाधव या तीन नेत्यांच्या निधनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांत तीन ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. दोन पैकी दोन जागांवर काँग्रेसचे आमदार पुन्हा निवडून आणण्यात काँग्रेस यशस्वी झाली.

Ashok chavan-Satej Patil-NCP, Pandharpur political news, Pandharpur Politics, Why the defeat of NCP in Pandharpur?
'तेव्हा' माझ्या पतीलाही नोटीस आली होती; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला फारसे महत्वाचे स्थान नसल्याचे काँग्रेसमधीलच एक गट सांगत असला तरीही देशात हरणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात यश मिळत आहे. देगलूरची जबाबदारी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी, तर कोल्हापूरची जबाबदारी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडली. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही राष्ट्रवादीला पंढरपूरची जागा पोटनिवडणुकीत जिंकता आली नाही. सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीचे नेतृत्व नसल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

Ashok chavan-Satej Patil-NCP, Pandharpur political news, Pandharpur Politics, Why the defeat of NCP in Pandharpur?
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना साईड पोस्टींग; चर्चेला उधाण...

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडल्या जाणाऱ्या आठ जागांपैकी सहा जागांवर निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसला विजयाचा गुलाल खेळण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीकडे असलेल्या नगर आणि सोलापूरची मतदार संघाची निवडणूक पुरेशा मतदाराअभावी पुढे ढकलण्यात आली. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पुणे पदवीधरमधील अरुण लाड यांचा विजय वगळता राष्ट्रवादीला गुलाल खेळण्याची संधी मिळाली नाही.

बंटी पाटील यांचे मॅनेजमेंट स्कील

कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक कशी बिनविरोध झाली? पारंपरिक विरोधक धनंजय महाडिक आणि सतेज पाटील एकामेकांच्या समोर असताना बिनविरोध झालेली निवडणूक आजही राज्यमंत्री बंटी पाटील यांचे मॅनेजमेंट स्कील सांगून जाते. पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची मदत घेतली, यातून देखील राज्यमंत्री पाटील यांचे कौशल्य सर्वांना दिसले आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने कोल्हापुरात कोणाचे वजन किती? हे समजत नव्हते. पोटनिवडणुकीच्या निकालातून कोल्हापूर कोणाचे? हे महाराष्ट्राला समजले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या रुपाने काँग्रेसला आश्‍वासक नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय कॉंग्रेसने वेळीच आणखी पाठबळ देण्याची आवश्‍यकता आहे.

वारसदार कोण पुत्र की पत्नी

काँग्रेसने देगलूरमध्ये (कै.) रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला उमेदवारी देत आमदार केले, तर कोल्हापुरातील चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी देत आमदार केले. चंद्रकांत जाधव यांचा मुलगा सत्यजित जाधव यांच्याऐवजी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. पंढरपुरात मात्र पोटनिवडणुकीत उमेदवार कोण? भगिरथ भालके की जयश्री भालके? याचे उत्तर राष्ट्रवादीला लवकर देता आले नाही. (कै.) भारत भालके यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविली. कॉंग्रेसकडून आमदार झाले. या दोन्ही पक्षांसोबत (कै.) भालके यांचे चांगले संबंध होते. परंतु राष्ट्रवादीला व भगिरथ भालके यांना पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविता आला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.